41 lines
5.3 KiB
Markdown
41 lines
5.3 KiB
Markdown
# वधस्तंभ
|
||
|
||
## व्याख्या:
|
||
|
||
पवित्रशास्त्राच्या काळात, वधस्तंभ जमिनीमध्ये अडकवलेला एक सरळ लाकडी खांब होता, ज्याच्या वरच्या बाजूला एक आडवी लाकडी तुळई जोडलेली होता.
|
||
|
||
* रोमी साम्राज्याच्या काळात, रोमी सरकार गुन्हेगारांना वधस्तंभावर बांधून किंवा खिळून शिक्षा देत असे व त्यांना तिथे मरण्यासाठी सोडून देत असे.
|
||
* येशूवर त्याने न केलेल्या गुन्ह्यांचा खोटा आरोप झाला आणि रोमी लोकांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारले.
|
||
* लक्षात घ्या की हा "ओलांडणे" या क्रियापदापासून पूर्णपणे वेगळा शब्द आहे ज्याचा अर्थ नदी किंवा तलावासारख्या एखाद्या गोष्टीच्या दुसऱ्या बाजूला जाणे असा होतो.
|
||
|
||
## भाषांतर सूचना
|
||
|
||
* क्रुसाच्या आकारास संदर्भित लक्ष्यित भाषेतील संज्ञा वापरून या संज्ञेचे भाषांतर केले जाऊ शकते.
|
||
* "शिक्षेचा खांब" किंवा "मृत्यूचे झाड" यासारख्या वाक्यांशांचा वापर करून ज्यावर लोक मारले गेले त्या वधस्तंभाचे वर्णन करण्याचा विचार करा.
|
||
* स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत पवित्रशास्त्राच्या भाषांतरात हा शब्द कसा भाषांतरीत केला जातो याचा विचार करा. (पाहा: [अज्ञातांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-unknown))
|
||
|
||
(हे देखील पाहा: [खिळणे](../kt/crucify.md), [रोम](../names/rome.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [1 करिंथ 1:17](rc://*/tn/help/1co/01/17)
|
||
* [कलस्सैकरांस पत्र 02:13-15](rc://*/tn/help/1co/01/17)
|
||
* [गलतीकरांस पत्र 06:11-13](rc://*/tn/help/col/02/13)
|
||
* [योहान 19:17-18](rc://*/tn/help/gal/06/11)
|
||
* [लुक 09:23-25](rc://*/tn/help/jhn/19/17)
|
||
* [लुक 23:26](rc://*/tn/help/luk/09/23)
|
||
* [मत्तय 10:37-39](rc://*/tn/help/luk/23/26)
|
||
* [फिलीप्पेकरास पत्र 02:5-8](rc://*/tn/help/mat/10/37)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[40:01](rc://*/tn/help/php/02/05)__ सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो __वधस्तंभ__ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
|
||
* __[40:02](rc://*/tn/help/obs/40/01)__ तेंव्हा ‘‘कवटी’’ नाव असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन आले आणि त्यांनी येशूच्या हाता व पाया __क्रुसावर__ खिळले.
|
||
* __[40:05](rc://*/tn/help/obs/40/02)__ यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर __वधस्तंभावरुन__ खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.’’
|
||
* __[49:10](rc://*/tn/help/obs/40/05)__ जेंव्हा येशू __वधस्तंभावर__ मरण पावला, तेंव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.
|
||
* __[49:12](rc://*/tn/help/obs/49/10)__ तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी __वधस्तंभावर__ मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.
|
||
|
||
## शब्द माहीती:
|
||
|
||
* स्ट्रोंग: जी4716
|