mr_tw/bible/kt/cross.md

5.3 KiB
Raw Permalink Blame History

वधस्तंभ

व्याख्या:

पवित्रशास्त्राच्या काळात, वधस्तंभ जमिनीमध्ये अडकवलेला एक सरळ लाकडी खांब होता, ज्याच्या वरच्या बाजूला एक आडवी लाकडी तुळई जोडलेली होता.

  • रोमी साम्राज्याच्या काळात, रोमी सरकार गुन्हेगारांना वधस्तंभावर बांधून किंवा खिळून शिक्षा देत असे व त्यांना तिथे मरण्यासाठी सोडून देत असे.
  • येशूवर त्याने न केलेल्या गुन्ह्यांचा खोटा आरोप झाला आणि रोमी लोकांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारले.
  • लक्षात घ्या की हा "ओलांडणे" या क्रियापदापासून पूर्णपणे वेगळा शब्द आहे ज्याचा अर्थ नदी किंवा तलावासारख्या एखाद्या गोष्टीच्या दुसऱ्या बाजूला जाणे असा होतो.

भाषांतर सूचना

  • क्रुसाच्या आकारास संदर्भित लक्ष्यित भाषेतील संज्ञा वापरून या संज्ञेचे भाषांतर केले जाऊ शकते.
  • "शिक्षेचा खांब" किंवा "मृत्यूचे झाड" यासारख्या वाक्यांशांचा वापर करून ज्यावर लोक मारले गेले त्या वधस्तंभाचे वर्णन करण्याचा विचार करा.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत पवित्रशास्त्राच्या भाषांतरात हा शब्द कसा भाषांतरीत केला जातो याचा विचार करा. (पाहा: अज्ञातांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: खिळणे, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 40:01 सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो वधस्तंभ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
  • 40:02 तेंव्हा ‘‘कवटी’’ नाव असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन आले आणि त्यांनी येशूच्या हाता व पाया क्रुसावर खिळले.
  • 40:05 यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरुन खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.
  • 49:10 जेंव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला, तेंव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.
  • 49:12 तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी4716