mr_tw/bible/kt/church.md

46 lines
6.5 KiB
Markdown

# मंडळी, चर्च
## व्याख्या:
नवीन करारामध्ये, “मंडळी” हा शब्द येशूमधील विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक गटाला सूचित करतो जो नियमितपणे एकत्र प्रार्थना करुन देवाचा संदेश ऐकत होता. “मंडळी” हा शब्द अनेकदा सर्व ख्रिस्ती लोकांना सूचित करतो.
* ही संज्ञा शब्दशः “बोलवलेली” सभा किंवा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी एकत्र जमलेल्या लोकांच्या मंडळीला संदर्भित करते.
* जेव्हा ही संज्ञा ख्रिस्ताच्या संपूर्ण शरीरामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा काही पवित्र शास्त्रातील भाषांतरे स्थानिक चर्चपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी (“चर्च”) या शब्दाचे पहीले अक्षर मोठे लिहीतात.
* एखाद्या विशिष्ट शहरातील विश्वासणारे बऱ्याचदा एखाद्याच्या घरी एकत्र जमत असत. या स्थानिक मंडळींना शहराचे नाव देण्यात आले जसे “इफिस येथील मंडळी”.
* पवित्र शास्त्रात “चर्च” इमारतीला संदर्भित करत नाही.
## भाषांतरातील सुचना:
* “मंडळी” या शब्दाचे भाषांतर “एकत्र जमणे” किंवा “मंडळी” किंवा “लोक” किंवा “एकत्रित येणारे” असे केले जाऊ शकते.
* या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेली संज्ञा किंवा वाक्यांश केवळ एका लहान गटाचा नाही तर सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करण्यास सक्षम असावी.
* “चर्च” या संज्ञेचे भाषांतर फक्त इमारतीला संदर्भित करत नाही हे सुनिश्चित करा.
* जुन्या करारात “मंडळी” हा शब्द भाषांतर करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा या शब्दाचा अनुवाद करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.
* स्थानिक किंवा राष्ट्रीय पवित्र शास्त्रातील भाषांतरामध्ये त्याचे कसे भाषांतर केले जाते याचा विचार करा. (पाहा: [अज्ञात भाषांतर कसे करावे].)
(हे देखील पाहा: [मंडळी](../other/assembly.md), [विश्वास ठेवणे](../kt/believe.md), [ख्रिस्ती](../kt/christian.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथ 5:12](rc://*/tn/help/1co/05/12)
* [1 थेस्सलनी 2:14](rc://*/tn/help/1th/02/14)
* [1 तिमथ्थी 3:5](rc://*/tn/help/1ti/03/05)
* [प्रेषित 9:31](rc://*/tn/help/act/09/31)
* [प्रेषित 14:23](rc://*/tn/help/act/14/23)
* [प्रेषित 15:41](rc://*/tn/help/act/15/41)
* [कलस्सै4:15](rc://*/tn/help/col/04/15)
* [इफिस 5:23](rc://*/tn/help/eph/05/23)
* [मत्तय 16:18](rc://*/tn/help/mat/16/18)
* [फिलिप्पै 4:15](rc://*/tn/help/php/04/15)
## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
* **[43:12](rc://*/tn/help/obs/43/12)** सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते यरुशलेमच्या **मंडळीचा** भाग बनले.
* **[46:9](rc://*/tn/help/obs/46/09)** अंत्युखियामधील बहुतेक लोक यहूदी नव्हते, परंतु पहिल्यांदाच, बरेच लोक विश्वासणारे झाले. बर्णबा आणि शौल तेथे या नवीन विश्वासणाऱ्यांना येशूविषयी अधिक शिकवण्यासाठी आणि **मंडळीला** बळकट करण्यासाठी गेले.
* **[46:10](rc://*/tn/help/obs/46/10)** म्हणून अंत्युखियामधील **मंडळीने** बर्णबा व शौलसाठी प्रार्थना केली आणि त्यांच्यावर आपले हात ठेवले. मग त्यांनी त्यांना इतर ठिकाणी येशुविषयची सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले.
* **[47:13](rc://*/tn/help/obs/47/13)** येशूविषयची चांगली बातमी सतत पसरत राहिली, आणि **मंडळी** वाढत राहिली.
* **[50:1](rc://*/tn/help/obs/50/01)** जवळजवळ 2,000 वर्षांपासून, जगातील अधिकाधिक लोक येशू ख्रिस्ताविषयी चांगली बातमी ऐकत आहेत. **मंडळी** वाढत आहे.
## शब्द संख्या:
* स्ट्रोंग: जी15770