6.5 KiB
6.5 KiB
मंडळी, चर्च
व्याख्या:
नवीन करारामध्ये, “मंडळी” हा शब्द येशूमधील विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक गटाला सूचित करतो जो नियमितपणे एकत्र प्रार्थना करुन देवाचा संदेश ऐकत होता. “मंडळी” हा शब्द अनेकदा सर्व ख्रिस्ती लोकांना सूचित करतो.
- ही संज्ञा शब्दशः “बोलवलेली” सभा किंवा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी एकत्र जमलेल्या लोकांच्या मंडळीला संदर्भित करते.
- जेव्हा ही संज्ञा ख्रिस्ताच्या संपूर्ण शरीरामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा काही पवित्र शास्त्रातील भाषांतरे स्थानिक चर्चपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी (“चर्च”) या शब्दाचे पहीले अक्षर मोठे लिहीतात.
- एखाद्या विशिष्ट शहरातील विश्वासणारे बऱ्याचदा एखाद्याच्या घरी एकत्र जमत असत. या स्थानिक मंडळींना शहराचे नाव देण्यात आले जसे “इफिस येथील मंडळी”.
- पवित्र शास्त्रात “चर्च” इमारतीला संदर्भित करत नाही.
भाषांतरातील सुचना:
- “मंडळी” या शब्दाचे भाषांतर “एकत्र जमणे” किंवा “मंडळी” किंवा “लोक” किंवा “एकत्रित येणारे” असे केले जाऊ शकते.
- या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेली संज्ञा किंवा वाक्यांश केवळ एका लहान गटाचा नाही तर सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करण्यास सक्षम असावी.
- “चर्च” या संज्ञेचे भाषांतर फक्त इमारतीला संदर्भित करत नाही हे सुनिश्चित करा.
- जुन्या करारात “मंडळी” हा शब्द भाषांतर करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा या शब्दाचा अनुवाद करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.
- स्थानिक किंवा राष्ट्रीय पवित्र शास्त्रातील भाषांतरामध्ये त्याचे कसे भाषांतर केले जाते याचा विचार करा. (पाहा: [अज्ञात भाषांतर कसे करावे].)
(हे देखील पाहा: मंडळी, विश्वास ठेवणे, ख्रिस्ती)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 करिंथ 5:12
- 1 थेस्सलनी 2:14
- 1 तिमथ्थी 3:5
- प्रेषित 9:31
- प्रेषित 14:23
- प्रेषित 15:41
- कलस्सै4:15
- इफिस 5:23
- मत्तय 16:18
- फिलिप्पै 4:15
पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
- 43:12 सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते यरुशलेमच्या मंडळीचा भाग बनले.
- 46:9 अंत्युखियामधील बहुतेक लोक यहूदी नव्हते, परंतु पहिल्यांदाच, बरेच लोक विश्वासणारे झाले. बर्णबा आणि शौल तेथे या नवीन विश्वासणाऱ्यांना येशूविषयी अधिक शिकवण्यासाठी आणि मंडळीला बळकट करण्यासाठी गेले.
- 46:10 म्हणून अंत्युखियामधील मंडळीने बर्णबा व शौलसाठी प्रार्थना केली आणि त्यांच्यावर आपले हात ठेवले. मग त्यांनी त्यांना इतर ठिकाणी येशुविषयची सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले.
- 47:13 येशूविषयची चांगली बातमी सतत पसरत राहिली, आणि मंडळी वाढत राहिली.
- 50:1 जवळजवळ 2,000 वर्षांपासून, जगातील अधिकाधिक लोक येशू ख्रिस्ताविषयी चांगली बातमी ऐकत आहेत. मंडळी वाढत आहे.
शब्द संख्या:
- स्ट्रोंग: जी15770