mr_tw/bible/kt/blasphemy.md

34 lines
3.5 KiB
Markdown

# निंदा, निंदा करणे, निंदनीय
## व्याख्या:
पवित्रशास्त्रात, "निंदा" या शब्दाचा अर्थ देव किंवा लोकांबद्दल खोल अनादर दर्शविणाऱ्या रीतीने बोलणे होय.. "एखाद्या व्यक्तीची "निंदा" करणे, म्हणजे त्या व्यक्तीच्या विरुद्ध बोलणे, जेणेकरून इतर लोक त्याच्याबद्दल चुकीचा किंवा वाईट विचार करतील.
* बहुतेकदा, देवाची निंदा करणे म्हणजे त्याच्याबद्दल सत्य नसलेल्या गोष्टी बोलून किंवा त्याचा अपमान करणाऱ्‍या अनैतिक रीतीने वागून त्याची निंदा करणे किंवा त्याचा अपमान करणे होय.
* एका खर्‍या देवाशिवाय दुसरा देव आहे असा दावा करणे किंवा देव असल्याचा दावा करणे ही मानवाने केलेली निंदा आहे.
* काही इंग्रजी आवृत्त्या, ह्याचे भाषांतर "खोटा आरोप करणे" असे करतात, जेव्हा त्याचा संदर्भ लोकांची निंदा करणे याच्याशी येतो.
## भाषांतर सूचना:
* "निंदा" या शब्दाचे भाषांतर "च्या विरुद्ध वाईट गोष्टी बोलणे" किंवा "देवाचा अनादर करणे" किंवा "खोटा आरोप करणे" असे केले जाऊ शकते.
* "निंदा" या शब्दाचा भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "इतरांबद्दल चुकीचे बोलणे" किंवा "खोटा आरोप ठेवणे" किंवा "खोट्या अफवा पसरवणे" ह्यांचा समावेश होतो.
(हे देखील पाहा: [अनादर](../other/dishonor.md), [खोटा आरोप करणे](../other/slander.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 तीमथी 1:12-14](rc://*/tn/help/1ti/01/12)
* [प्रेषितांची कृत्ये 6:11](rc://*/tn/help/act/06/10)
* [प्रेषितांची कृत्ये 26:9-11](rc://*/tn/help/act/26/09)
* [याकोबाचे पत्र 2:5-7](rc://*/tn/help/jas/02/05)
* [योहान 10:32-33](rc://*/tn/help/jhn/10/32)
* [लुक 12:10](rc://*/tn/help/luk/12/08)
* [मार्क 14:64](rc://*/tn/help/mrk/14/63)
* [मत्तय 12:31](rc://*/tn/help/mat/12/31)
* [मत्तय 26:65](rc://*/tn/help/mat/26/65)
* [स्तोत्र 74:10](rc://*/tn/help/psa/074/009)
## माहिती समूह:
* स्ट्रोंग : H1288, H1442, H2778, H5006, H5007, H5344, G09870, G09880, G09890