3.5 KiB
3.5 KiB
निंदा, निंदा करणे, निंदनीय
व्याख्या:
पवित्रशास्त्रात, "निंदा" या शब्दाचा अर्थ देव किंवा लोकांबद्दल खोल अनादर दर्शविणाऱ्या रीतीने बोलणे होय.. "एखाद्या व्यक्तीची "निंदा" करणे, म्हणजे त्या व्यक्तीच्या विरुद्ध बोलणे, जेणेकरून इतर लोक त्याच्याबद्दल चुकीचा किंवा वाईट विचार करतील.
- बहुतेकदा, देवाची निंदा करणे म्हणजे त्याच्याबद्दल सत्य नसलेल्या गोष्टी बोलून किंवा त्याचा अपमान करणाऱ्या अनैतिक रीतीने वागून त्याची निंदा करणे किंवा त्याचा अपमान करणे होय.
- एका खर्या देवाशिवाय दुसरा देव आहे असा दावा करणे किंवा देव असल्याचा दावा करणे ही मानवाने केलेली निंदा आहे.
- काही इंग्रजी आवृत्त्या, ह्याचे भाषांतर "खोटा आरोप करणे" असे करतात, जेव्हा त्याचा संदर्भ लोकांची निंदा करणे याच्याशी येतो.
भाषांतर सूचना:
- "निंदा" या शब्दाचे भाषांतर "च्या विरुद्ध वाईट गोष्टी बोलणे" किंवा "देवाचा अनादर करणे" किंवा "खोटा आरोप करणे" असे केले जाऊ शकते.
- "निंदा" या शब्दाचा भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "इतरांबद्दल चुकीचे बोलणे" किंवा "खोटा आरोप ठेवणे" किंवा "खोट्या अफवा पसरवणे" ह्यांचा समावेश होतो.
(हे देखील पाहा: अनादर, खोटा आरोप करणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 तीमथी 1:12-14
- प्रेषितांची कृत्ये 6:11
- प्रेषितांची कृत्ये 26:9-11
- याकोबाचे पत्र 2:5-7
- योहान 10:32-33
- लुक 12:10
- मार्क 14:64
- मत्तय 12:31
- मत्तय 26:65
- स्तोत्र 74:10
माहिती समूह:
- स्ट्रोंग : H1288, H1442, H2778, H5006, H5007, H5344, G09870, G09880, G09890