mr_tw/bible/kt/beloved.md

3.1 KiB

प्रिय

व्याख्या:

"प्रिय" हा शब्द आपुलकीची अभिव्यक्ती आहे जो एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणारा आणि प्रिय असलेल्या व्यक्तीचे वर्णन करतो.

  • “प्रिय” या संज्ञेचा शाब्दिक अर्थ “प्रिय (जन)” किंवा “(ज्यावर) प्रिती केली जाते.”
  • देव येशूला त्याचा “प्रिय पुत्र” असे म्हणतो.
  • ख्रिस्ती मंडळीना लिहिलेल्या पत्रांत प्रेषित वारंवार आपल्या सहविश्वासू बांधवांना “प्रिय” म्हणून संबोधीत असे.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर “प्रिय” किंवा “प्रिय व्यक्ती” किंवा “प्रियजन” किंवा “खूप प्रिय” म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • एखाद्या जवळच्या मित्राबद्दल बोलण्याच्या संदर्भात त्याचे “माझे प्रिय मित्र” किंवा “माझा जवळचा मित्र” असे भाषांतरित केले जाऊ शकते. इंग्रजीमध्ये “माझा प्रिय मित्र, पौल” किंवा “ पौल, जो माझा प्रिय मित्र आहे” असे म्हणणे स्वाभाविक आहे. इतर भाषांना हे वेगळ्या प्रकारे प्रदान करणे अधिक नैसर्गिक वाटू शकते.
  • लक्षात घ्या की “प्रिय” हा शब्द देवाच्या प्रेमाच्या शब्दापासून आला आहे, जो बिनशर्त, निःस्वार्थ आणि त्याग आहे.

(हे देखील पाहा: प्रेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

स्ट्रोंग:एच157, एच1730, एच2532, एच3033, एच3039, एच4261, जी25, जी27, जी5207