mr_tw/bible/kt/altar.md

32 lines
3.4 KiB
Markdown

# वेदी
## व्याख्या:
वेदी एक उभारलेली रचना होती ज्याच्या वर इस्राएल लोक देवाला प्राणी आणि धान्ये अर्पण करत.
* बायबलच्या काळात, साध्या वेद्या पुष्कळदा मातीचा ढिगारा तयार करून किंवा स्थिर रास तयार करण्यासाठी मोठमोठे दगड ठेवून बनविल्या जात असे.
* सोने, पितळ किंवा कांस्य धातूने आच्छादलेल्या काही विशिष्ट पेटीच्या आकाराच्या वेद्या लाकडाने बनविल्या जात असे.
* इस्राएल लोकांच्या जवळ राहणाऱ्या इतर लोकांच्या गटांनीही आपल्या दैवतांना बलिदान अर्पण करण्यासाठी वेद्या बांधल्या.
(हे देखील पाहा: [धूप जाळण्याची वेदी](../other/altarofincense.md), [खोट्या देवता](../kt/falsegod.md), [अन्नार्पण](../other/grainoffering.md), [बलिदान](../other/sacrifice.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [उत्पत्ति 8:20](rc://*/tn/help/gen/08/20)
* [उत्पत्ति 22:9](rc://*/tn/help/gen/22/09)
* [याकोबाचे पत्र 2:21](rc://*/tn/help/jas/02/21)
* [लुक 11:49-51](rc://*/tn/help/luk/11/49)
* [मत्तय 5:23](rc://*/tn/help/mat/05/23)
* [मत्तय 23:19](rc://*/tn/help/mat/23/18)
## पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:
* __[3:14](rc://*/tn/help/obs/03/14)__ नोहा तारवाबाहेर आल्यानंतर, त्याने __वेदी__ बांधली व यज्ञासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातून काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले.
* __[5:8](rc://*/tn/help/obs/05/08)__ जेंव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी जेंव्हा पोहोचले तेंव्हा अब्राहामाने आपला पुत्र इसहाक यास बांधले व __वेदीवर__ ठेविले.
* __[13:9](rc://*/tn/help/obs/13/09)__ याजक पशूनस मारून __वेदीवर__ त्याचे होमार्पण करत असे.
* __[16:6](rc://*/tn/help/obs/16/06)__ त्याने (गिदोन) मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ‌त्याने जीवंत देवासाठी एक नवीन __वेदी__ बांधली व त्यावर देवाला यज्ञ अर्पण केला.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H0741, H2025, H4056, H4196, G10410, G23790