3.4 KiB
3.4 KiB
वेदी
व्याख्या:
वेदी एक उभारलेली रचना होती ज्याच्या वर इस्राएल लोक देवाला प्राणी आणि धान्ये अर्पण करत.
- बायबलच्या काळात, साध्या वेद्या पुष्कळदा मातीचा ढिगारा तयार करून किंवा स्थिर रास तयार करण्यासाठी मोठमोठे दगड ठेवून बनविल्या जात असे.
- सोने, पितळ किंवा कांस्य धातूने आच्छादलेल्या काही विशिष्ट पेटीच्या आकाराच्या वेद्या लाकडाने बनविल्या जात असे.
- इस्राएल लोकांच्या जवळ राहणाऱ्या इतर लोकांच्या गटांनीही आपल्या दैवतांना बलिदान अर्पण करण्यासाठी वेद्या बांधल्या.
(हे देखील पाहा: धूप जाळण्याची वेदी, खोट्या देवता, अन्नार्पण, बलिदान)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:
- 3:14 नोहा तारवाबाहेर आल्यानंतर, त्याने वेदी बांधली व यज्ञासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातून काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले.
- 5:8 जेंव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी जेंव्हा पोहोचले तेंव्हा अब्राहामाने आपला पुत्र इसहाक यास बांधले व वेदीवर ठेविले.
- 13:9 याजक पशूनस मारून वेदीवर त्याचे होमार्पण करत असे.
- 16:6 त्याने (गिदोन) मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळत्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर देवाला यज्ञ अर्पण केला.
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H0741, H2025, H4056, H4196, G10410, G23790