mr_ta/translate/translate-bmoney/01.md

7.5 KiB

वर्णन

जुन्या कराराच्या सुरुवातीच्या काळात, लोक त्यांच्या धातूंचे वजन करतात, जसे की चांदी आणि सोने, आणि वस्तू खरेदी करण्यासाठी त्या धातूचे विशिष्ट वजन मोजायचे. नंतर, लोकांनी नाणी बनवण्यास सुरुवात केली ज्यामध्ये प्रत्येकामध्ये विशिष्ट धातूचे प्रमाण असते. डॅरिक हे असेच एक नाणे आहे. नवीन कराराच्या काळात लोक चांदी आणि तांब्याची नाणी वापरत असे.

खालील दोन तक्ते जुना करार (ओटी) आणि नवीन करार (एनटी) यामध्ये आढळलेल्या पैशांचे काही सुप्रसिद्ध घटक दर्शवतात. जुना करार घटकाची सारणी दर्शविते की कोणत्या प्रकारच्या धातूचा वापर केला गेला आणि त्याचे वजन किती होते. नवीन करार घटकाची सारणी दर्शविते की कोणत्या प्रकारचे धातू वापरले गेले होते आणि दिवसाच्या वेतनाच्या ते  किती किमतीची होती हे दर्शविते.

जुना करारामध्ये घटक धातू वजन
डॅरिक सोन्याचे नाणे 8.4 ग्रॅम
शेकेल विविध धातू 11 ग्रॅम
किक्कार विविध धातू 33 किलोग्रॅम
नवीन करारामध्ये घटक धातू दिवसाचे वजन
दीनार / दीनारी चांदीचे नाणे 1 दिवस
ड्रक्मा चांदीचे नाणे 1 दिवस
माइट तांब्याचे नाणे 1/64 दिवास
शेकेल चांदीचे नाणे 4 दिवस
किक्कार चांदी 6,000 दिवस

भाषांतर तत्त्वे

वर्षानुवर्षे बदलत असल्याने आधुनिक पैशाची मूल्ये वापरू नका. त्यांचा वापर केल्याने बायबलचे भाषांतर जुने आणि चुकीचे होईल.

भाषांतर रणनीती

जुना कराररामधील बहुतेक पैशाचे मूल्य हे त्याच्या वजनावर आधारित होते. म्हणूनच जुन्या करारातील या वजनांचे भाषांतर करताना,बायबलसंबंधीचे वजन पाहा. नवीन करारातील पैशाच्या मूल्याचे भाषांतर करण्यासाठी खालील धोरणे आहेत.

(1) बायबलमधील शब्द वापरा आणि ते शब्दलेखन ते जसे वाटते तसे करा. (पहा शब्द नकरल करा किंवा उधार घ्या.)

(2) पैशाचे मूल्य ते कोणत्या धातूपासून बनवले गेले आणि किती नाणी वापरण्यात आली यानुसार त्याचे वर्णन करा.

(3) बायबलच्या काळातील लोक एका दिवसाच्या कामात किती कमाई करू शकत होते या संदर्भात पैशाच्या मूल्याचे वर्णन करा.

(4) बायबलसंबंधी संज्ञा वापरा आणि मजकूर किंवा तळटीपमध्ये समतुल्य रक्कम द्या.

(5) बायबलसंबंधी संज्ञा वापरा आणि तळटीपमध्ये स्पष्ट करा.

भाषांतर धोरणे लागू

भाषांतर धोरणे सर्व खाली लूक 7:41 वर लागू आहेत.

एकाकडे 500 दीनार आणि दुसऱ्याकडे, 50 दीनार देणे होते. (लूक 7:41ब युएलटी)

  1. बायबलमधील शब्द वापरा आणि ते शब्दलेखन ते जसे वाटते तसे करा. (पहा शब्द नकरल करा किंवा उधार घ्या.)

“एकाला 500 दीनार,आणि दुसऱ्याला, 50 दीनार देणे होते.”

(2) पैशाचे मूल्य ते कोणत्या धातूपासून बनवले गेले आणि किती नाणी वापरण्यात आली यानुसार त्याचे वर्णन करा.

“एकाला 500 चांदीचे नाणे, आणि दुसऱ्याला, 50 चांदीचे नाणे देणे होते.”

(3) बायबलच्या काळातील लोक एका दिवसाच्या कामात किती कमाई करू शकत होते या संदर्भात पैशाच्या मूल्याचे वर्णन करा.

“एकाली 500 दिवासचे वेतन,आणि दुसऱ्याला, 50 दिवसाचे वेतन देणे होते.”

(4) बायबलसंबंधी संज्ञा वापरा आणि मजकूर किंवा तळटीपमध्ये समतुल्य रक्कम द्या.

“एकाला 500 दीनार 1, आणि दुसऱ्याला 50 दीनार0 देणे होते. 2”

तळटीप यासारखे दिसतील:

[1] 500 दिवासाचे वेतन [2] 50 दिवसाचे वेतन

(5) बायबलसंबंधी संज्ञा वापरा आणि तळटीपमध्ये स्पष्ट करा.

“एकाला 500 दीनार,1 आणि दुसऱ्याला, 50 दीनार देणे होते.” (लुक 7:41 युएलटी)

[1] एक दीनार म्हणजे लोक एका दिवसाच्या कामात कमावणारी चांदीची रक्कम होती.