mr_ta/translate/translate-bweight/01.md

10 KiB

वर्णन

खालील संज्ञा बायबलमधील वजनाची सर्वात सामान्य एकके आहेत. "शेकेल" या शब्दाचा अर्थ "वजन" असा आहे आणि इतर अनेक वजनांचे वर्णन शेकेलच्या संदर्भात केले आहे. यातील काही वजनाचा वापर पैशासाठी केला जात होता.यातील काही वजनांचा वापर पैशासाठी केला जात असे. खालील तक्त्यातील मेट्रिक मूल्ये बायबलसंबंधी मापांच्या बरोबरीची नाहीत. बायबलसंबंधी मापे वेळोवेळी आणि ठिकाणानुसार अचूक प्रमाणात भिन्न होते. खालील समतुल्य फक्त सरासरी मोजमाप देण्याचा प्रयत्न आहे.

मूळ मोजमाप शेकेल ग्राम किलोग्रॅम
शेकेल 1 शेकेल 11 ग्रॅम -
बेकाह 1/2 शेकेल 5.7 ग्रॅम -
पीम 2/3 शेकेल 7.6 ग्रॅम -
गेराह 1/20 शेकेल 0.57 ग्रॅम -
मन 50 शेकेल 550 ग्रॅम 1/2 किलोग्रॅम
किक्कार 3,000 शेकेल - 34 किलोग्रॅम

भाषांतर तत्त्वे

  1. बायबलमधील लोकांनी मीटर, लिटर आणि किलोग्रॅम यांसारखे आधुनिक मापांचा वापर केला नाही. मूळ मापांचा वापर केल्याने वाचकांना हे समजण्यास मदत होऊ शकते की बायबल खरोखर फार पूर्वी अशा काळात लिहिले गेले होते जेव्हा लोक ही मापे वापरत असत.
  2. आधुनिक मापांचा वापर केल्याने वाचकांना मजकूर अधिक सहजपणे समजण्यास मदत होऊ शकते.
  3. आपण जे माप वापरता, ते शक्य असेल तर, मजकूर किंवा तळटीपमध्ये इतर प्रकारचे माप सांगणे चांगले आहे.
  4. तुम्ही बायबलसंबंधी मापे वापरत नसल्यास, मोजमाप अचूक असल्याची कल्पना वाचकांना न देण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही एका गेराहचे भाषांतर “.57 ग्रॅम” असे केले तर वाचकांना वाटेल की मोजमाप अचूक आहे. "अर्धा ग्रॅम" असे म्हणणे चांगले होईल.
  5. काही वेळा मोजमाप अचूक नाही हे दाखवण्यासाठी "सुमारे" हा शब्द वापरणे उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ, 2 शमुवेल 21:16 म्हणते की गल्याथाच्या भाल्याचे वजन 300 शेकेल होते. याचे भाषांतर “3300 ग्रॅम” किंवा “3.3 किलोग्रॅम” असे करण्याऐवजी “साधारण साडेतीन किलोग्रॅम” असे केले जाऊ शकते.
  6. जेव्हा देव लोकांना सांगतो की एखाद्या गोष्टीचे वजन किती असावे आणि जेव्हा लोक ते वजन वापरतात तेव्हा भाषांतरात "सुमारे" म्हणू नका. अन्यथा, वस्तूचे वजन नेमके किती असावे याची देवाला पर्वा नाही, असा आभास निर्माण होईल.

भाषांतर रणनीती

  1. युएलटीमधील मोजमाप वापरा. हे त्याच प्रकारचे मोजमाप आहेत जे मूळ लेखक वापरतात. त्यांचे शब्दलेखन अशा प्रकारे करा जे ते जसे आवाज करतात किंवा युएलटीमध्ये शब्दलेखन केले आहेत त्याप्रमाणे आहे. (पाहा शब्द नकल किंवा उसणे घ्या.)
  2. युएलटीमध्ये दिलेले मेट्रिक माप वापरा. यूएसटीच्या अनुवादकांनी मेट्रिक सिस्टीममध्ये रक्कम कशी दर्शवायची हे आधीच शोधून काढले आहे.
  3. तुमच्या भाषेत आधीच वापरलेली मोजमाप वापरा. हे करण्यासाठी, तुमची मोजमाप मेट्रिक सिस्टीमशी कशी संबंधित आहे हे तुम्हाला माहित असणे आणि प्रत्येक मोजमाप काढणे आवश्यक आहे.
  4. युएलटीमधील मोजमाप वापरा आणि मजकूर किंवा नोटमध्ये तुमच्या लोकांना माहीत असलेली मोजमापांचा समावेश करा.
  5. तुमच्या लोकांना माहीत असलेली मापे वापरा आणि युएलटीमधील मोजमाप मजकूरात किंवा नोटमध्ये समाविष्ट करा.

भाषांतर रणनीती लागू

खालील सर्व धोरणे निर्गम 38:29 वर लागू आहेत.

ओवाळीच्या अर्पनातील अर्पण केलेले पितळ 70 किक्कार व 2,400 शेकेल होते . (निर्गम 38:29 युएलटी).

  1. युएलटीमधील मोजमाप वापरा. हे त्याच प्रकारचे मोजमाप आहेत जे मूळ लेखक वापरतात. त्यांचे शब्दलेखन अशा प्रकारे करा जे ते जसे आवाज करतात किंवा युएलटीमध्ये शब्दलेखन केले आहेत त्याप्रमाणे आहे. (पाहा शब्द नकल किंवा उसणे घ्या.)

"ओवाळीच्या अर्पनातील अर्पण केलेले पितळ 70 किक्कार व 2,400 शेकेल होते."

  1. युएलटीमध्ये दिलेले मेट्रिक माप वापरा. यूएसटीच्या अनुवादकांनी मेट्रिक सिस्टीममध्ये रक्कम कशी दर्शवायची हे आधीच शोधून काढले आहे.

"ओवाळीच्या अर्पनातील अर्पण केलेले पितळ 2,400 किलोग्रम होते."

  1. तुमच्या भाषेत आधीच वापरलेली मोजमाप वापरा. हे करण्यासाठी, तुमची मोजमाप मेट्रिक सिस्टीमशी कशी संबंधित आहे हे तुम्हाला माहित असणे आणि प्रत्येक मोजमाप काढणे आवश्यक आहे.

"ओवाळीच्या अर्पनातील अर्पण केलेले पितळ 5,300 पौंड होते."

  1. युएलटीमधील मोजमाप वापरा आणि मजकूर किंवा नोटमध्ये तुमच्या लोकांना माहीत असलेली मोजमापांचा समावेश करा.

“ओवाळीच्या अर्पनातील अर्पण केलेले पितळ 70 किक्कार 2,380 किलोग्रॅम आणि 2,400 शेकेल (26.4 किलोग्रॅम) होते.”

  1. तुमच्या लोकांना माहीत असलेली मापे वापरा आणि युएलटीमधील मोजमाप मजकूरात किंवा नोटमध्ये समाविष्ट करा.

“ओवाळीच्या अर्पनातील अर्पण केलेले पितळ 70 किक्कार आणि 2,400 शेकेल होते. 1”

तळटीप असे दिसेल:

[1] हे एकूण सुमारे 2,400 किलोग्रॅम होते.