mr_ta/translate/figs-quotemarks/01.md

17 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

उर्वरित मजकूरातील प्रत्यक्ष अवतरणास ​चिन्हांकित करण्यासाठी काही भाषा अवतरण चिन्हांचा उपयोग करतात. इंग्रजी “अवतरणाच्या त्वरीत अगोदर व" त्वरीत नंतर चिन्हाचा वापर करते.

  • योहान म्हणाला, "मला माहिती नाही की मी केव्हा येईन."

अप्रत्यक्ष अवतरणांसह उद्धरण चिन्हे वापरली जात नाहीत.

  • योहान म्हणाला की त्याला माहिती नव्हते की तो केव्हा येईल."

इतर अवतराणांध्ये अवतरांचे अनेक स्तर असतात तेव्हा कोण काय म्हणत आहे हे वाचकांना समजणे अवघड होऊ शकते. दोन प्रकारच्या अवतरण चिन्हांची अदलाबदल केल्याने सावध वाचकांना त्यांचा मागोवा ठेवण्यास मदत होईल. इंग्रजीमध्ये, बाह्यतम अवतरणात दुहेरी अवतरण चिन्हे असतात, आणि त्यामधील पुढच्या अवतरणामध्ये एकेरी चिन्हे असतात. जर तेथे तिसरा अंत केलेले अवतरण असेल तर त्या अवतरणाला पुन्हा दुहेरी अवतरण चिन्हे असतात.

  • मरिया म्हणाली, "योहान म्हणाला, 'मला माहिती नाही की मी केव्हा येईन.' "
  • बॉब म्हणाला, "मरियेने मला सांगितले, 'योहान म्हणाला, "मला माहिती नाही की मी केव्हा येईन." ' "

काही भाषा इतर प्रकारच्या उद्धरण चिन्हांचा उपयोग करतात: येथे काही उदाहरणे आहेत: „ “ ” « » ⁊ — .

बायबलमधील उदाहरणे

खालील उदाहरणे य़ुएलटीमध्ये वापरलेल्या अवतरण चिन्हांकित केलेले प्रकार दर्शवतात.

एक स्तर असलेले अवतरण

प्रत्यक्ष उद्धरणाच्या पहील्या स्तरात दुहेरी अवतरणाचे चिन्हे आहे.

तेव्हा राजाने उत्तर दिले, “म्हणजे तो एलीया तिश्बी आहे.” (२ राजे १:८ युएलटी)

दोन स्तर असलेले अवतरण

प्रत्यक्ष अवतरणाच्या दुसऱ्या स्तरामध्ये त्याच्याभोवती एकेरी उध्दरण चिन्हे असतात. तुम्हाला ते स्पष्टपणे दिसण्यासाठी आम्ही त्यास छापले आहे व ठळक वाक्यांशात मुद्रित केले आहे.

त्यांनी त्याला विचारले, "'आपली बाज उचलून चाल', असे ज्याने तुला सांगितले तो कोण पुरुष आहे?” (योहान ५: १२ युएलटी)

…. त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, “तुम्ही समोरच्या गावात जा. तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हांला आढळेल. त्यास सोडा व माझ्याकडे आणा. जर ' तुम्ही त्यास का सोडता'? असे कोणी तुम्हांला विचारले, तर ‘प्रभूला याची गरज आहे' असे तुम्ही सांगा.” (लूक १९:२९-३१ युएलटी)

तीन स्तर असलेले उद्धरण

प्रत्यक्ष अवतरणाच्या तिसऱ्या स्तरामध्ये त्याच्याभोवती दुहेरी अवतरण चिन्हे असतात. तुम्हाला ते स्पष्टपणे दिसण्यासाठी आम्ही त्यास छापले आहे व ठळक वाक्यांशात मुद्रित केले आहे.

मग अब्राहाम म्हणाला, “कारण मला असे वाटले, 'या ठिकाणामध्ये परमेश्वराचे भय मुळीच नाही, म्हणून माझ्या पत्निसाठी ते मला ठार करतील.' शिवाय, ती खरोखर माझी बहीण आहे, माझ्या बापाची मुलगी, पण माझ्या आईची मुलगी नाही; म्हणून ती माझी बायको झाली. जेव्हा देवाने मला माझ्या बापाचे घर सोडायला लावले व ठिक ठिकाणी प्रवास करावयास लावला, तेव्हा मी तीला म्हणालो, ' माझी पत्नी म्हणून तू माझ्याशी हा विश्वासुपणा दाखव: ज्या ठिकाणी आपण जाऊ, माझ्याविषयी असे म्हण "तो माझा भाऊ आहे." ' " (उत्पत्ती २०:११-१३ युएलटी)

चार स्तर असलेले अवतरम

प्रत्यक्ष अवतरणाच्या चौथ्या स्तरामध्ये एकेरी अवतरण चिन्हे असतात. तुम्हाला ते स्पष्टपणे दिसण्यासाठी आम्ही त्यास छापले आहे व ठळक वाक्यांशात मुद्रित केले आहे.

ते त्याला म्हणाले, “आम्हाला एक पुरुष भेटायला आला जो आम्हाला म्हणाला, 'ज्या राजाने तुम्हाला पाठविले त्याच्याकडे परत जा, व त्यास म्हणा, "परमेश्वर असे म्हणतो: 'इस्त्राएलामध्ये कोणी देव नाही म्हणून तू एक्रोना देवता बआल-जबूब याला विचारपुस करावयास माणसे पाठविलीस काय? म्हणून ज्या पलंगावर तू पडलेला आहेस त्यावरून तू खाली उतरणार नाहीस: त्याऐवजी, तू निश्चित मरशील.'" ' " (२ राजे १:६ युएलटी)

अवतरण चिन्हांकन पध्दती

वाचकांना प्रत्येक उद्धरण कोठे सुरू होते आणि कोठे समाप्त होते हे पाहण्यास आपण मदत करू शकता असे काही मार्ग येथे आहेत जेणेकरुन कोण काय बोलले हे त्यांना अधिक सहजपणे कळेल.

(१) प्रत्यक्ष अवतरणाचे स्तर दर्शविण्यासाठी दोन प्रकारच्या उध्दरण चिन्हांची अदलाबदल करा. इंग्रजी दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्हांची अदलाबदल करते.

(२) अप्रत्यक्ष कोट्सची आवश्यकता नसल्यामुळे, कमी अवतरण चिन्हे वापरण्यासाठी एक किंवा अवतरणामधील काहींचे अप्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतर करा. (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उद्धरण पाहा)

(3) जर अवतरण खूप लांब आहे आणि त्यामध्ये अवतरणाचे अनेक स्तर आहेत, तर एकूण मुख्य अवतरण लावा, आणि त्याच्या आत प्रत्यक्ष अवतरणांसाठी ​केवळ अवतरण चिन्हांचा वापर करा.

अवतरण चिन्हांकनाच्या उदाहरणांचे लागुकरण

(१) खाली यूएलटीतील मजकूरात दर्शविल्याप्रमाणे प्रत्यक्ष अवतरणाचे स्तर दर्शविण्यासाठी दोन प्रकारच्या अवतरण चिन्हांची अदलाबदल करा.

ते त्याला म्हणाले, “आम्हाला एक पुरुष भेटायला आला जो आम्हाला म्हणाला, 'ज्या राजाने तुम्हाला पाठविले त्याच्याकडे परत जा, व त्यास म्हणा, "परमेश्वर असे म्हणतो: 'इस्त्राएलामध्ये कोणी देव नाही म्हणून तू एक्रोना देवता, बआल-जबूब याला विचारपुस करावयास माणसे पाठविलीस काय? म्हणून ज्या पलंगावर तू पडलेला आहेस त्यावरून तू खाली उतरणार नाहीस; त्याऐवजी, तू निश्चित मरशील.' "'" (२ राजे १:६ युएलटी)

(२) अप्रत्यक्ष कोट्सची आवश्यकता नसल्यामुळे, कमी अवतरण चिन्हे वापरण्यासाठी एक किंवा अवतरणामधील काहींचे अप्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतर करा. इंग्रजीमध्ये, “तो” हा शब्द अप्रत्यक्ष अवतरणाचा परिचय देऊ शकतो. खाली दिलेल्या उदाहरणात, “ते” या शब्दानंतरचे सर्व काही संदेशवाहकांनी राजाला काय म्हटले याचे अप्रत्यक्ष अवतरण आहे. त्या अप्रत्यक्ष अवतरणामध्ये, काही प्रत्यक्ष अवतरणे दुहेरी व एकेरी अवतरण चिन्हांसह अधोरेखित केले आहेत.

ते त्याला म्हणाले, “आम्हाला एक पुरुष भेटायला आला जो आम्हाला म्हणाला, 'ज्या राजाने तुम्हाला पाठविले त्याच्याकडे परत जा, व त्यास म्हणा, "परमेश्वर असे म्हणतो: 'इस्त्राएलामध्ये कोणी देव नाही म्हणून तू एक्रोना देवता, बआल-जबूब याला विचारपुस करावयास माणसे पाठविलीस काय? म्हणून ज्या पलंगावर तू पडलेला आहेस त्यावरून तू खाली उतरणार नाहीस; त्याऐवजी, तू निश्चित मरशील.'"'" (२ राजे १:६ युएलटी)

त्यांनी त्याला सांगतिले की त्यांना एक पुरुष भेटायला आला जो त्यांना म्हणाला, 'ज्या राजाने तुम्हाला पाठविले त्याच्याकडे परत जा, व त्यास म्हणा, 'परमेश्वर असे म्हणतो: "इस्त्राएलामध्ये कोणी देव नाही म्हणून तू एक्रोना देवता, बआल-जबूब याला विचारपुस करावयास माणसे पाठविलीस काय? म्हणून ज्या पलंगावर तू पडलेला आहेस त्यावरून तू खाली उतरणार नाहीस; त्याऐवजी, तू निश्चित मरशील."'"

(3) जर अवतरण खूप लांब आहे आणि त्यामध्ये अवतरणाचे अनेक स्तर आहेत, तर एकूण मुख्य अवतरण लावा, आणि त्याच्या आत प्रत्यक्ष अवतरणांसाठी ​केवळ अवतरण चिन्हांचा उपयोग करा.

ते त्याला म्हणाले, “आम्हाला एक पुरुष भेटायला आला जो आम्हाला म्हणाला, 'ज्या राजाने तुम्हाला पाठविले त्याच्याकडे परत जा, व त्यास म्हणा, "परमेश्वर असे म्हणतो: 'इस्त्राएलामध्ये कोणी देव नाही म्हणून तू एक्रोना देवता, बआल-जबूब याला विचारपुस करावयास माणसे पाठविलीस काय? म्हणून ज्या पलंगावर तू पडलेला आहेस त्यावरून तू खाली उतरणार नाहीस; त्याऐवजी, तू निश्चित मरशील.'"'" (२ राजे १:६ युएलटी)

ते त्याला म्हणाले,

आम्हाला एक पुरुष भेटायला आला जो आम्हाला म्हणाला, 'ज्या राजाने तुम्हाला पाठविले त्याच्याकडे परत जा, व त्यास म्हणा, "परमेश्वर असे म्हणतो: "इस्त्राएलामध्ये कोणी देव नाही म्हणून तू एक्रोना देवता, बआल-जबूब याला विचारपुस करावयास माणसे पाठविलीस काय? म्हणून ज्या पलंगावर तू पडलेला आहेस त्यावरून तू खाली उतरणार नाहीस; त्याऐवजी, तू निश्चित मरशील."'"