mr_ta/translate/figs-quotations/01.md

11 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

दोन प्रकारचे उद्धरण आहेत: प्रत्यक्ष उद्धरण आणि अप्रत्यक्ष उद्धरण.

जेव्हा कोणीतरी मुळ वक्त्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीने जे सांगितले आहे त्याचा अहवाल देतो तेव्हा प्रत्यक्ष उध्दरण घडते. लोक सहसा अशी अपेक्षा करतात की या प्रकारचे उद्धरण मूळ वक्त्याच्या अचूक शब्दांचे प्रतिनिधित्व करेल. खाली दिलेल्या उदाहरणात, योहानाने स्वतःचा उल्लेख करताना “मी” असे म्हटले असेल, म्हणून योहानाच्या शब्दांचा अहवाल देणारा निवेदक योहानाला संदर्भित करण्यासाठी उध्दरणामध्ये “मी” हा शब्द वापरतो. हे योहानाचे अचूक शब्द आहेत असे दर्शविण्यासाठी, बर्‍याच भाषांमध्ये उद्धरण चिन्हाच्या दरम्यान शब्द टाकतात: “.”

  • योहान म्हणाला, “मला माहीत नाही कोणत्या समयी माझे येणे होईल.”

जेव्हा वक्ता एखादाने जे म्हटले आहे त्याचा अहवाल देतो तेव्हा अप्रत्यक्ष उध्दरण येते, परंतू या मुद्यात, वक्ता मुळ व्यक्तीच्या दृष्टीकोनातून नाही तर त्याऐवजी आपल्या स्वत:च्या दृष्टीकोणातून त्याचा अहवाल देत आहे. या प्रकारच्या उध्दरणामध्ये सामान्यत: सर्वनामांमध्ये बदल असतो आणि त्यामध्ये बऱ्याचदा वेळ, शब्द निवडी आणि लांबी यातील बदल असतात. खालील उदाहरणात, वर्णनकर्ता उध्दरणामध्ये योहानाला “तो” म्हणून संबोधत आहे आणि “करील” या शब्दाने निर्देशित केलेला भविष्य काळ बदलण्यासाठी “होईल” या शब्दाचा उपयोग करतो.

  • योहान म्हणाला की त्याला माहीत नाही कोणत्या समयी त्याचे येणे होईल.

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

काही भाषांमध्ये, अहवाल दिलेले भाषण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उध्दरणाद्वारे व्यक्त केले जाऊ शकते. इतर भाषांमध्ये, इतरांपेक्षा एकाचा वापर करणे अधिक नैसर्गिक आहे. दुसऱ्याऐवजी एकाचा अर्थ लागु केल्याने काही विशिष्ट अर्थ प्राप्त होऊ शकतात.तर प्रत्येक उध्दरणासाठी, भाषांतरकारांना प्रत्यक्ष उध्दरण म्हणून किंवा अप्रत्यक्ष उध्दरण म्हणून भाषांतर करणे उत्तम आहे की नाही हे ठरविण्याची गरज आहे.

बायबलमधील उदाहरणे

खाली दिलेल्या उदाहरणांतील वचनांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही उध्दरण आहेत. खाली दिलेल्या स्पष्टीकरणातील वचनाला, आम्ही उद्धृत केलेल्या शब्दांना ठळकपणे चिन्हांकित केले आहे.

मग त्याने त्याला कोणालाही न सांगण्याची आज्ञा केली, परंतू, “जा, स्वत:स मुख्य याजकाला दाखव आणि मोशेने जे नियम दिले त्यानुसार, त्यांना एक साक्ष म्हणून आपल्या शुध्दीकरणासाठी अर्पण कर .” (लूक ५:१४ युएलटी)

  • अप्रत्यक्ष उध्दरण: कोणालाही न सांगण्याची त्याने त्याला आज्ञा केली,
  • प्रत्यक्ष उध्दरण: परंतू त्याला सांगितले, “जा, स्वत:स मुख्य याजकला दाखव …

परुश्यांनी जेव्हा त्याला विचारले की, देवाचे राज्य केव्हा येईल, त्याने त्यांना उत्तर दिले व म्हणाला, “देवाच राज्य दृश्य स्वरुपात येत नाही. आणि ते असे म्हणणार नाही , पाहा. ते येथे आहे!' किंवा 'ते तेथे आहे! कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. (लुक १७:२०-२१ युएलटी)

  • अप्रत्यक्ष उध्दरण: परुशांनी विचारले असता देवाचे राज्या केव्हा येईल,
  • प्रत्यक्ष उध्दरण, त्याने त्यांना उत्तर दिले व म्हणाला “देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही. आणि ते असे म्हणणार नाहीत, ‘पाहा. ते येथे आहे! किंवा ‘ते तेथे आहे! कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.
  • प्रत्यक्ष उध्दरण: आणि ते असे म्हणणार नाही, पाहा, ते येथे आहे! किंवा, ते तेथे आहे!

भाषांतर पध्दती

जर स्त्रोत मजकूरामध्ये वापरलेला एका प्रकारचे उध्दरण आपल्या भाषेत चांगले कार्य करत असेल तर त्याचा वापर करण्याचा विचार करा.त्या संदर्भात वापरलेले एका प्रकारचे उध्दरण आपल्या भाषेसाठी नैसर्गिक नसेल तर या पध्दतींचे अनुसरण करा.

(१) जर प्रत्यक्ष उध्दरण आपल्या भाषेत चांगले कार्य करत नसेल तर त्यास अप्रत्यक्ष उध्दरणामध्ये बदला.

(२) जर अप्रत्यक्ष उध्दरण आपल्या भाषेत चांगले कार्य करत नसेल तर ते प्रत्यक्ष उध्दरणामध्ये बदला.

भाषांतर पध्दतीच्या उदारणांचे लागूकरण

(१) जर प्रत्यक्ष उध्दरण आपल्या भाषेत चांगले कार्य करत नसेल तर त्यास अप्रत्यक्ष उध्दरणामध्ये बदला.

मग त्याने त्याला कोणालाही न सांगण्याची आज्ञा केली, तर, “जाऊन, स्वत:स मुख्य याजकाला दाखव आणि मोशेने जे नियम दिले त्यानुसार, त्यांना एक साक्ष म्हणून आपल्या शुध्दीकरणासाठी अर्पण कर.” (लूक ५:१४ युएलटी)

मग त्याने त्याला कोणालाही न सांगण्याची आज्ञा केली, तर जाऊन स्वत:स याजकास दाखव आणि मोशेने जे नियम दिले त्यानुसार, त्यांना एक साक्ष म्हणून आपल्या शुध्दीकरणासाठी अर्पण कर असे सांगितले.

(२) जर अप्रत्यक्ष उध्दरण आपल्या भाषेत चांगले कार्य करत नसेल तर ते प्रत्यक्ष उध्दरणामध्ये बदला.

मग त्याने त्याला कोणालाही न सांगण्याची आज्ञा केली, तर, “जाऊन, स्वत:स मुख्य याजकाला दाखव आणि मोशेने जे नियम दिले त्यानुसार, त्यांना एक साक्ष म्हणून आपल्या शुध्दीकरणासाठी अर्पण कर.” (लूक ५:१४ युएलटी)

त्याने त्याला आज्ञा केली "कोणालाही सांगू नको. तर जा आणि स्वत:स याजकाला दाखव आणि मोशेने जे नियम दिले त्यानुसार, त्यांना एक साक्ष म्हणून आपल्या शुध्दीकरणासाठी अर्पण कर."

आपणास व्हिडीयो देखील पाहण्यासा इच्छा असेल तर https://ufw.io/figs_उध्दरण.