mr_ta/translate/figs-parables/01.md

12 KiB

दाखला हा एक छोटी कथा आहे जे सत्य आहे असे काहीतरी शिकवते आणि समजण्यास सोपी आणि विसरणे कठीण अशा प्रकारे धडा देते.

वर्णन

दाखला हा एक छोटी कथा आहे जे सत्य आहे असे काहीतरी शिकवण्यासाठी सांगितली जाते. दाखल्यातील घटना घडू शकल्या असत्या तरी प्रत्यक्षात त्या घडल्या नाहीत. त्यांना फक्त धडा शिकवण्यासाठी सांगितले जाते जे ऐकणाऱ्याने शिकायचे असते. दाखल्यामध्ये क्वचितच विशिष्ट लोकांची नावे असतात. (हे तुम्हाला दाखला काय आहे आणि वास्तविक घटनेचे वर्णन काय आहे हे ओळखण्यात मदत करू शकते.) दाखल्यामध्ये सहसा समान आणि रूपक यासारख्या शब्दाच्या जाती वापरल्या जातात.

त्याने त्यांना एक दाखला सांगितला: “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय?" (लूक 6:39 युएलटी)

या दाखल्यातून शिकवले जाते की जर एखाद्या व्यक्तीकडे आध्यात्मिक ज्ञान नसेल, तर तो इतरांना आध्यात्मिक गोष्टी समजण्यास मदत करू शकत नाही.

बायबलमधील उदाहरणे

आणि लोक दिवा लावून तो भांड्याखाली लपवून ठेवीत नाही, परंतू उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. “तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की ते तुमची चांगली कृत्ये पाहतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्याची स्तुती करतील. (मत्तय 5:15-16 युएलटी)

हा दाखला आपल्याला शिकवतो की आपण इतर लोकांपासून देवासाठी कसे जगतो ते लपवू नये.

मग येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. तो म्हाणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण त्याचे झाड मात्र खूप मोठे येते, इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.” (मत्तय 13:31-32 युएलटी)

हा दाखला शिकवतो की देवाचे राज्य सुरुवातीला लहान वाटेल, परंतु ते वाढेल आणि जगभर पसरेल.

भाषांतर रणनीती

(1) जर अज्ञात गोष्टी असल्यामुळे एखादा दाखला समजणे कठीण असेल, तर तुम्ही अज्ञात वस्तूंच्या जागी तुमच्या संस्कृतीतील लोकांना माहीत असलेल्या वस्तूंसह त्यात बदल करू शकता. तथापि, धडा समान ठेवण्याची काळजी घ्या.

(2) दाखल्याची शिकवण अस्पष्ट असल्यास, ते प्रस्तावनेत काय शिकवते त्याबद्दल थोडेसे सांगण्याचा विचार करा, जसे की “येशूने ही गोष्ट उदार होण्याबद्दल सांगितली.”

लागू केलेल्या भाषांतर धोरणांची उदाहरणे

(1) जर अज्ञात गोष्टी असल्यामुळे एखादा दाखला समजणे कठीण असेल, तर तुम्ही अज्ञात वस्तूंच्या जागी तुमच्या संस्कृतीतील लोकांना माहीत असलेल्या वस्तूंसह त्यात बदल करू शकता. तथापि, धडा समान ठेवण्याची काळजी घ्या.

येशू त्यांना असेही म्हणाला, “दिवा टोपलीखाली, किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणला जात नाही ना? तो दीपस्तंभावर ठेवण्यासाठी नाही का?” (मार्क 4:21 युएलटी)

जर लोकांना दीपस्तंभ म्हणजे काय हे माहित नसेल, तर तुम्ही त्याऐवजी दुसरे काहीतरी वापरू शकता ज्यावर लोक दिवा ठेवतात जेणेकरून ते घराला प्रकाश देऊ शकेल.

येशू त्यांना असेही म्हणाला, “दिवा टोपलीखाली, किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणला जात नाही ना? तो उंच फळीवर ठेवण्यासाठी नाही का?”

मग येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. तो म्हाणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. तो खरंच सर्व बियांमध्ये सर्वात लहान आहे. पण जेव्हा ते उगवते तेव्हा ते बागेच्या झाडांपेक्षा मोठे असते. ते झाड बनते, जेणेकरून हवेतील पक्षी येऊन त्याच्या फांद्यांत घरटे बांधतात." (मत्तय 13:31-32 युएलटी)

बिया पेरणे म्हणजे त्यांना फेकणे जेणेकरून ते जमिनीवर विखुरले जातील. जर लोक पेरणीशी परिचित नसतील, तर तुम्ही लागवड असे म्हणू शकता.

मग येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. तो म्हाणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेतला आणि आपल्या शेतात त्याची लागवडित केली. तो खरंच सर्व बियांमध्ये सर्वात लहान आहे. पण जेव्हा ते उगवते तेव्हा ते बागेच्या झाडांपेक्षा मोठे असते. ते झाड बनते, जेणेकरून हवेतील पक्षी येऊन त्याच्या फांद्यांत घरटे बांधतात."

(2) दाखल्याची शिकवण अस्पष्ट असल्यास, ते प्रस्तावनेत काय शिकवते त्याबद्दल थोडेसे सांगण्याचा विचार करा, जसे की “येशूने ही गोष्ट उदार होण्याबद्दल सांगितली.”

येशू त्यांना असेही म्हणाला, “दिवा टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणला जात नाही हो ना ? तो दीपस्तंभावर ठेवावे म्हणून नाही का आणला जात?” (मार्क 4:21 युएलटी)

त्यांनी उघडपणे साक्ष का द्यावी याबद्दल येशूने त्यांना एक दाखला सांगितला. येशू त्यांना असेही म्हणाला, “दिवा टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणला जात नाही हो ना ? तो दीपस्तंभावर ठेवावे म्हणून नाही का आणला जात?” (मार्क 4:21 युएलटी)

मग येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. तो म्हाणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेतला आणि आपल्या शेतात पेरला. मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण जेव्हा ते उगवते तेव्हा ते बागेच्या झाडांपेक्षा मोठे असते. ते झाड बनते, जेणेकरून हवेतील पक्षी येऊन त्याच्या फांद्यांत घरटे बांधतात."    (मत्तय 13:31-32 युएलटी)

मग देवाचे राज्य कसे वाढते याबद्दल येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. तो म्हाणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेतला आणि आपल्या शेतात पेरला, मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण जेव्हा ते उगते तेव्हा ते बागेच्या झाडांपेक्षा मोठे असते. ते झाड बनते, जेणेकरून हवेतील पक्षी येऊन त्याच्या फांद्यांत घरटे बांधतात."