mr_ta/translate/figs-simile/01.md

14 KiB

वर्णन

उपमा अलकांर म्हणजे सामान्यता समान नसलेल्या दोन गोष्टींची केलेली तुलना. उपमा दोन गोष्टींमध्ये समान असणार्‍या विशिष्ट गुणधर्मावर लक्ष केंद्रित करते, आणि त्यामध्ये "सारखे," "जसे," किंवा "पेक्षा" अशा शब्दांचा समावेश असतो.

आणि जेव्हा त्याने लोकसमुदायास पाहिले, तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व निराश होते. (मत्तय ९:३६ युएलटी )

येशूने लोकांची तुलना मेंढपाळ नसलेल्या मेंढराशी केली आहे. सुरक्षित स्थानांमध्ये नेण्यासाठी उत्तम मेंढपाळ नसल्यास मेंढरे घाबरुन जातात. लोकसमुदाय त्यासारखाच होता कारण त्यांच्याकडे चांगले धार्मिक पुढारी नव्हते.

पाहा, लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी असा. (मत्तय १०:१६ युएलटी)

येशूने त्याच्या शिष्यांची तुलना मेंढरांसोबत आणि त्यांच्या शत्रूची लांडग्यांसोबत केली आहे. लांडगे मेंढरांवर हल्ला करतात. येशूचे शत्रूं त्याच्या शिष्यांवर हल्ला करतील.

कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार आहे. (इब्री. ४:१२ युएलटी)

देवाच्या वचनाची दुधारी तलवारीबरोबर तुलना केली जाते. दुधारी तलवार म्हणजे एक हत्यार जे सहजपणे एखाद्या माणसाच्या देहाला कापू शकते. एका व्यक्तीच्या हृदय आणि विचार यामध्ये काय आहे हे दाखविण्यासाठी देवाचे वचन फार प्रभावी आहे.

उपमा अलंकाराचा उद्देश

  • उपमा काहीतरी अज्ञात असलेली गोष्ट ज्ञान असलेल्या गोष्टीशी कशाप्रकारे समान आहे याबद्दल शिकविते.
  • उपमा एका विशिष्ट गुणधर्मावर भर देते, कधीकधी अशा प्रकारे ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते.
  • उपमा मनात एक चित्र तयार करण्यात मदत करतात किंवा वाचक जे काही वाचत आहे त्याचा अधिक पुर्णपणे अनुभव घेण्यास त्यांना मदत करतात.

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

  • कदाचित लोकांना दोन वस्तू समान कशा आहेत हे माहिती नसेल.
  • कदाचित लोक तुलना करत असलेल्या दोन्ही गोष्टींशी परिचित नसतील.

बायबलमधील उदाहरणे

ख्रिस्त येशूच्या एका चांगला सैनिकाप्रमाणे माझ्याबरोबर दु:ख सोस. (२ तीमथ्य २:३ युएलटी)

या उपमेमध्ये, पौलाने दु:ख सोसण्याची तुलना सैनिकांच्या सहनशीलतेची केली आहे,आणि तो तीमथ्याला त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देतो.

“कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचे होईल. (लूक १७:२४ युएलटी)

मनुष्याचा पुत्र वीजेसारखा कसे असेल हे या वचनात सांगण्यात आले नाही. परंतु संदर्भामध्ये आपण त्याआधीच्या अध्यायातून समजू शकतो की ज्याप्रमाणे विज अचानक चमकते आणि प्रत्येकजण त्यास पाहू शकतो, त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र अचानक येईल आणि प्रत्येकजण त्याला पाहू शकतील. कोणालाही त्याबद्दल सांगतो येणार नाही.

भाषांतर पध्दती

जर लोकांना उपमा अलंकाराचा अचूक अर्थ समजेल, तर त्याचा वापर करण्याचा विचार करा. जर त्यांना समजणार नसेल, तर येथे काही पध्दती आहेत त्याचा उपयोग तुम्ही करू शकता:

(१) दोन गोष्टी कशा समान आहेत हे लोकांना कळत नसल्यास, त्या कशाप्रकारे समान आहेत ते सांगा. तथापि, मूळ प्रेक्षकांना अर्थ स्पष्ट नसल्यास असे करू नका. (२) लोक जर तुलणा केली जात असलेल्या गोष्टीशी परिचित नसल्यास, आपल्या संस्कृतीतील एखाद्या गोष्टीचा उपयोग करा. ते बायबलच्या संस्कृतीत वापरले जात होते याची खात्री करा. जर तुम्ही या पध्दतीचा उपयोग केला, तर तुम्ही मूळ गोष्ट तळटीपमध्ये ठेवू शकता. (३) दुसर्‍याशी तुलना न करता केवळ त्या गोष्टीचे वर्णन करा.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणांचे लागूकरण

१) दोन गोष्टी कशा समान आहेत हे लोकांना कळत नसल्यास, त्या कशाप्रकारे समान आहेत ते सांगा. तथापि, मूळ प्रेक्षकांना अर्थ स्पष्ट नसल्यास असे करू नका.

पाहा,लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे, तसे मी तुम्हांस पाठवीत आहे. (मत्तय १०:१६अ युएलटी) - लांडग्यांनी घेरलेल्या मेंढरांवर संकट येते त्याप्रकारच्या संकटात येशुचे शिष्य पडतील याची अशा संकटाशी तुलना केली जाते.

पाहा, मी तुम्हाला दुष्ट लोकांमध्ये पाठवितो व जेव्हा लांडण्यांमध्ये मेंढरे असतात तेव्हा संकटात असतात तसे त्यांच्याद्वारे तुम्ही संकटात पडाल..

कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा धारदार आहे. (इब्री ४:१२अ युएलटी)

कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि एका अतिशय तीक्ष्ण दुधारी तरवारीपेक्षा अधिक शक्तीशाली आहे.

(२) लोक जर तुलणा केली जात असलेल्या गोष्टीशी परिचित नसल्यास, आपल्या संस्कृतीतील एखाद्या गोष्टीचा उपयोग करा. ते बायबलच्या संस्कृतीत वापरले जात होते याची खात्री करा. जर तुम्ही या पध्दतीचा उपयोग केला, तर तुम्ही मूळ गोष्ट तळटीपमध्ये ठेवू शकता.

पाहा, लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे, तसे मी तुम्हांस पाठवीत आहे.(मत्तय १०:१६अ युएलटी)- जर लोकांना मेंढरे आणि लांडगे काय आहेत , किंवा लांडगे मेंढरांना मारतात आणि खातात हे माहित नसेल, तर तुम्ही इतर दुसऱ्या प्राण्यांचा वापर करू शकता जे दुसऱ्या इतरांना मारतात.

पाहा, कुत्र्यांमध्ये जसे कोंबडीच्या पिल्लांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवीत आहे.

जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली एकत्र करते, तशी कितीवेळा तुझ्या मुलांना एकत्र करण्याची माझी इच्छा होती, परंतु तुम्हीची इच्छा नव्हती! (मत्तय २३:३७ब युएलटी)

जशी एक आई आपल्या बाळावर बारकाईने नजर ठेवते, तशी कितीवेळा तुझ्या मुलांना एकत्र करण्यास मी इच्छीत होतो, परंतू तुम्ही नाकारले!

जर तुमझ्यामध्ये मोहरीच्या दाण्यासारखा विश्वास असला … (मत्तय १७:२०)

जर तुमचा विश्वास एका लहान बीजासारखा अगदी लहान असेल,

(३) दुसर्‍याशी तुलना न करता केवळ त्या गोष्टीचे वर्णन करा.

पाहा, लांडग्यांमध्ये जसे मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो. (मत्तय १०:१६अ युएलटी)

पाहा, जे लोक तुला हानी करू इच्छीतात त्यांच्यामध्ये मी तुला पाठवितो.

जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली एकत्र करते, तशी कितीवेळा तुझ्या मुलांना एकत्र करण्याची माझी इच्छा होती, परंतु तुम्हीची इच्छा नव्हती! ( (मत्तय २३:३७ब युएलटी))

कितीवेळा तुझे संरक्षण करण्याची माझी इच्छा होती, पण तुम्ही नाकारले !