mr_ta/translate/figs-events/01.md

12 KiB

वर्णन

बायबलमध्ये, प्रंसंग नेहमी घडलेल्या क्रमाने सांगितले जात नाहीत.कधीकधी नुकत्याच बोललेल्या प्रसंगापेक्षा पूर्वीच्या समयात घडलेल्या एखाद्या गोष्टीवर चर्चा करण्याची लेखकाची इच्छा असते. हे वाचकांसाठी गोंधळात टाकणारे असु शकते.

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

वाचकांना कदाचित वाटेल की त्या घटना सांगितल्या गेल्या त्या क्रमाने घडल्या आहेत. त्यांना प्रसंगांचा योग्य क्रम समजण्यास मदत करणे महत्वाचे आहे.

बायबलमधील उदाहरणे

त्याने त्यात याचीही जोड दिली: त्याने योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. मग असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा झाला, येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. (लुक ३:२०-२१ युएलटी)

हे योहानाला तुरूंगात टाकल्यानंतर योहानाने येशूचा बाप्तिस्मा केल्या यासारखे वाटू शकते, परंतु योहानाला तुरूंगात टाकले जाण्यापूर्वी योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला.

यहोशवाने लोकांना सांगितल्याप्रमाणे, सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वरापुढे पुढे आले व रणशिंगे फुंकली, आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागे निघाला. परंतू यहोशवाने लोकांना आज्ञा केली व म्हणाला, "जयघोष करू नका तुमचा आवाज ऐकू जावू देऊ नका, जोपर्यंत मी तुम्हाला जयघोष करण्यास सांगत नाही तोपर्यंत तुम्ही एक शब्दही तोंडातून काढू नका. नंतर तुम्ही जयघोष करा.” (यहोशवा ६:८,१० युएलटी)

सैन्याने आपला मोर्चा आधीच सुरू केल्यावर जयघोष न करण्याचा आदेश यहोशवाने दिला होता असे वाटेल, पण ते कूच करण्यापूर्वीच त्याने तो आदेश दिला होता

गुंडाळीचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे?” (प्रकटीकरण ५:२ युएलटी)

एका व्यक्तीने प्रथम गुंडाळी उघडणे आवश्यक आहे आणि नंतर त्याचे शिक्के फोडले पाहिजेत असे दिसते, परंतु गुंडाळी उघडण्याच्या आधी गुंडाळीला बंद केलेले शिक्के फोडणे आवश्यक आहे.

भाषांतर पध्दती

(१) जर तुमची भाषा अगोदरच उल्लेख केलेल्या प्रसंगाच्या पुर्वी एखादा प्रसंग घडला आहे असे दर्शविण्यासाठी वाक्यांश व समयाच्या शब्दांचा उपयोग करत असेल, तर त्यापैकी एकाचा उपयोग करण्याचा विचार करा.

(२) जर तुमची भाषा अगोदरच उल्लेख केलेल्या प्रसंगाच्या पुर्वी एखादा प्रसंग घडला आहे असे दर्शविण्यासाठी क्रियापद काळ किंवा पैलू यांचा उपयोग करत असेल, तर त्याचा उपयोग करण्याचा विचार करा. ( वरील विभाग पाहा “पैलू” क्रियापद.)

(३) आपली भाषा प्रसंग घडलेल्या क्रमाने सांगण्यास प्राधान्य देत असेल तर, त्या प्रसंगाला पुर्नक्रमित करण्याचा विचार करा जेणेकरुन ते त्या क्रमाने राहतात. यासाठी दोन किंवा अधिक वचने एकत्र ठेवण्याची आवश्यकता असू शकते (जसे की ५-६) (पाहा वचन पुल.)

भाषांतर पद्धतींचे उदाहरणाचे लागूकरण

(१) जर तुमची भाषा अगोदरच उल्लेख केलेल्या प्रसंगाच्या पुर्वी एखादा प्रसंग घडला आहे असे दर्शविण्यासाठी वाक्यांश व समयाच्या शब्दांचा उपयोग करत असेल, तर त्यापैकी एकाचा उपयोग करण्याचा विचार करा.

२० त्याने त्यात याचीही जोड दिली: त्याने योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. मग असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा झाला, येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. (लुक ३:२०-२१ युएलटी)

२० परंतू मग हेरोदाने… योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले होते. २१ योहानाला तुरुंगात टाकण्यापुर्वी, जेव्हा सर्व लोक योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेत होते, येशुने देखील बाप्तिस्मा घेतला.

गुंडाळीचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे.? (प्रकटीकरण ५:२ब युएलटी)

त्याचे शिक्के फोडल्यानंतर गुंडाळी उघडण्यास कोण पात्र आहे?

(२) जर तुमची भाषा अगोदरच उल्लेख केलेल्या प्रसंगाच्या पुर्वी एखादा प्रसंग घडला आहे असे दर्शविण्यासाठी क्रियापद काळ किंवा पैलू यांचा उपयोग करत असेल, तर त्याचा उपयोग करण्याचा विचार करा.

यहोशवाने लोकांना सांगितल्याप्रमाणे, सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वरापुढे ते पुढे आले व रणशिंगे फुंकली, परंतू यहोशवाने लोकांना आज्ञा केली व म्हणाला, "जयघोष करू नका तुमचा आवाज ऐकू जावू देऊ नका, जोपर्यंत मी तुम्हाला जयघोष करण्यास सांगत नाही तोपर्यंत तुम्ही एक शब्दही तोंडातून काढू नका. नंतर तुम्ही जयघोष करा."

८ यहोशवाने लोकांना सांगितल्याप्रमाणे, सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वरापुढे चालले, जसे ते पुढे चालले, त्यांनी जोरात रणशिंगे फुंकली १० परंतू यहोशवाने लोकांना आज्ञा दिली होती , "जयघोष करू नका. जोपर्यंत मी तुम्हाला जयघोष करण्यास सांगत नाही तोपर्यंत तुम्ही एक शब्दही तोंडातून काढू नका. मग नंतरच तुम्ही जयघोष करा."

(३) आपली भाषा प्रसंग घडलेल्या क्रमाने सांगण्यास प्राधान्य देत असेल तर, त्या प्रसंगाला पुर्नक्रमित करण्याचा विचार करा जेणेकरुन ते त्या क्रमाने राहतात. यासाठी दोन किंवा अधिक वचने एकत्र ठेवण्याची आवश्यकता असू शकते (जसे की ५-६).

८ यहोशवाने लोकांना सांगितल्याप्रमाणे, सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वरापुढे चालले ते पुढे आले व रणशिंगे फुंकली, परंतू यहोशवाने लोकांना आज्ञा केली व म्हणाला, "जयघोष करू नका तुमचा आवाज ऐकू जावू देऊ नका, जोपर्यंत मी तुम्हाला जयघोष करण्यास सांगत नाही तोपर्यंत तुम्ही एक शब्दही तोंडातून काढू नका. नंतर तुम्ही जयघोष करा." (यहोशवा ६:८,१० युएलटी )

८,१० यहोशवाने लोकांना आज्ञा केली, व म्हणाला, "जयघोष करू नका. जोपर्यंत मी तुम्हाला जयघोष करण्यास सांगत नाही तोपर्यंत तुम्ही एक शब्दही तोंडातून काढू नका. मग नंतरच तुम्ही जयघोष करा." मग यहोशवाने लोकांना सांगितल्याप्रमाणे, सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वरापुढे चालले, जसे ते पुढे चालले, त्यांनी जोरात रणशिंगे फुंकिली…

गुंडाळीचे शिक्के फोडण्यास व ती उघडण्यास कोण पात्र आहे? (प्रकटीकरण ५:२ब युएलटी)

शिक्के फोडण्यास व गुंडाळी उघडण्यास कोण पात्र आहे?

आपणास व्हिडीयो पाहण्याची इच्छा असल्यास https://ufw.io/figs_प्रसंग.