mr_ta/translate/translate-versebridge/01.md

8.1 KiB

वर्णन

काही प्रकरणांमध्ये, आपण unfoldingWord® सरलीकृत मजकूर (युएलटी) मध्ये पहाल की दोन किंवा अधिक वचन संख्या एकत्रित केल्या आहेत, जसे की 17-18. यालाच वचन पूल म्हणतात. याचा अर्थ, वाचानांमधील माहितीची पुनर्रचना झाली आहे ज्यामुळे कथा किंवा संदेश अधिक सहजपणे समजला जाऊ शकतो.

29 होऱ्यांची कुळे होती ती ही: लोटान, शोबाल, सिबोन, अना, 30 दिशोन, एसर, दीशान: सेईर देशातील त्यांच्या कुळांच्या यादीनुसार ही होरींची कुळे आहेत. (उत्पत्ती 36: 29-30 युएलटी)

29-30 होरचे वंशज असलेले लोक सेईर देशात राहत होते. लोटान, शोबाल, सिबोन, अना, दिशोन, एसर आणि दीशान ही लोकसमूहांची नावे आहेत. (उत्पत्ति 36:29-30 युएलटी)

युएलटी मजकूरात, वचन 29 आणि 30 वेगवेगळे आहेत आणि सेईरमध्ये राहणाऱ्या लोकांची माहिती 30 वचनाच्या शेवटी आहे. यूएसटी मजकूरात, वचने जोडलेले आहेत, आणि सेईरमध्ये राहणाऱ्यांबद्दलची माहिती सुरुवातीला आहे. बर्‍याच भाषांसाठी, हा माहितीचा अधिक तार्किक क्रम आहे.

बायबलमधील उदाहरणे

जेथे युएलटीमध्ये वचन पुल आहे, युएलटीमध्ये स्वतंत्र वचने असतील.

4-5आमचा देव परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्हाला आशीर्वाद देईल. जर तुम्ही तुमचा देव परमेश्वरा याच्या आज्ञा पाळल्या आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या सर्व आज्ञा पाळल्या तर तुमच्यामध्ये कोणीही लोक गरीब राहणार नाहीत. (अनुवाद 15:4-5 युएलटी)

4तथापि, तुमच्यामध्ये कोणीही गरीब नसावा (कारण परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या भूमीत तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल), 5आज मी तुम्हांला दिलेल्या या सर्व आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याची वाणी काळजीपूर्वक ऐकली तरच.(अनु15:4-5 युएलटी).

16-17 पण परमेश्वर त्याला म्हणाला, “मी तुला त्या झाडाची फळे खाण्याची परवानगी देणार नाही ज्यामुळे तुला कोणती कृती चांगली आणि कोणती कृती वाईट आहे हे कळेल. जर तुम्ही त्या झाडाचे कोणतेही फळ खाल तर तुम्ही ते खाल्ल्या दिवशी नक्कीच मराल. पण मी तुम्हाला बागेतील इतर कोणत्याही झाडाची फळे खाण्याची परवानगी देईन. (उत्पत्ती 2:16-17 युएसटी)

16 परमेश्वर देवाने त्या मनुष्याला आज्ञा दिली, “बागेतील प्रत्येक झाडाचे फळ तू मुक्तपणे खा. 17 पण चांगले आणि वाईट याचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका, कारण ज्या दिवशी तुम्ही ते खाल त्या दिवशी तुम्ही नक्कीच मराल.” (उत्पत्ती 2:16-17 युएलटी)

भाषांतर सूचना.

तुमच्या वाचकांना स्पष्ट होईल अशा प्रकारे माहितीचा क्रम लावा. जर माहितीचा क्रम युएलटीमध्ये आहे तसा स्पष्ट असेल तर त्या क्रमाचा वापर करा. परंतु जर क्रम गोंधळात टाकणारा असेल किंवा चुकीचा अर्थ देत असेल तर क्रम बदला जेणेकरून ते अधिक स्पष्ट होईल.

(1) जर तुम्ही आधीच्या वचनातील माहितीच्या आधी एका वचनाची माहिती दिली तर त्या वचनांना एकत्र करा आणि दोन वचन संख्यांमध्ये संयोगचिन्ह लावा.

translationStudio मधील अध्याय चिन्हांकित कसे करायचे ते पाहा.

लागू केलेल्या भाषांतर धोरणांची उदाहरणे

(1) जर तुम्ही आधीच्या वचनातील माहितीच्या आधी एका वचनाची माहिती दिली तर त्या वचनांना एकत्र करा आणि दोन वचनांच्या संख्येमध्ये संयोगचिन्ह लावा.

2 तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे त्यात तुझ्यासाठी तीन नगरे राखून ठेव. 3 मनुष्यवध करणाऱ्या कोणालाही तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे त्या देशाचे तीन भाग कर. (अनुवाद 19:2-3 युएलटी)

2-3 तो जे तुला देत आहे त्या तीन नगरांना तीन भागात विभाजित कर. त्यानंतर प्रत्येक भागातील एक शहर निवड. लोकांना त्या शहरांमध्ये सहज जाता यावे यासाठी तुम्ही चांगले रस्ते केले पाहिजेत. जो कोणी दुसर्‍याला मारतो तो सुरक्षित राहण्यासाठी त्या शहरांपैकी एका शहरात पळून जाऊ शकतो (अनुवाद 19:2-3 युएलटी)