mr_ta/translate/figs-declarative/01.md

10 KiB

व्याख्या

सामान्यत: माहिती देण्यासाठी विधानांचा वापर केला जातो. कधीकधी ते इतर कार्यांसाठी बायबलमध्ये वापरले जातात.

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

जे विधान बायबल मध्ये वापरले आहे त्या विधानाचे काही भाषा काही कार्यांसाठी उपयोग करणार नाहीत.

बायबलमधील उदाहरणे

विधाने सहसा माहिती देण्यासाठी वापरली जातात. योहान 1:6-8 मधील सर्व विधाने खाली दिलेली आहेत, आणि त्यांचे कार्य माहिती देणे आहे.

तो प्रकाशाविषयी साक्ष देण्यासाठी एक साक्षीदार म्हणून आला, यासाठी की सर्व जणांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. योहान प्रकाश नव्हता, तर प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. (योहान १:६-८ यूएलटी)

एखाद्याला काय करावे हे सांगण्यासाठी विधानाचा उपयोग आज्ञा म्हणून देखील केला जाऊ शकतो. खालील उदाहरणांमध्ये, मुख्य याजकानी लोकांना काय करावे हे सांगण्यासाठी “होईल” या क्रियापदासह विधानाचा वापर केला.

त्याने त्यांना आज्ञा दिली, म्हणाला "तुम्हाला करायचे ते हे आहे. तुमच्यापैकी एक तृतीयांश शब्बाथ दिवशी येता त्यांनी राजमंदिरावर पहारा ठेवावा; आणि एक तृतीयांश लोकांनी सुर वेशीत राहावे", आणि एक तृतीयांश लोकांनी पहारेकरांच्या मागे वेशीत राहावे (२ राजे ११:५ युएलटी)

सूचना देण्यासाठी देखील विधानाचा वापर केला जाऊ शकतो. खाली वक्ता योसेफा भविष्यात काहीतरी करील असे योसेफास सांगत नव्हता; तो जोसेफास सांगत होता की त्याला काय करावे लागेल.

तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. (मत्तय १:२१ युएलटी)

विधनाचा उपयोग विनंती करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. कुष्ठरोगी मनुष्य येशू काय करु शकत होता हे केवळ सांगत नव्हता. तो त्याला बरे करण्यास देखील सांगत होता.

आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून म्हणाला, "प्रभुजी, तुमची इच्छा असली तर, तुम्ही मला शुद्ध करु शकता." (मत्तय ८:२ युएलटी)

एक विधान काहीतरी सादर करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. त्याच्यामुळे भुमि शापित आहे असे आदामाला सांगण्याने, देवाने खरोखर तीला शाप दिला.

... कारण तुझ्यामुळे भुमि शापित आहे; (उत्पत्ती ३:१७ युएलटी)

त्याच्या पापांची क्षमा झाली असे त्या मनुष्याला सांगण्याने, मनुष्यांच्या पापाची येशू क्षमा केली.

जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहीला, तो कुष्ठरोगी मनुष्याला म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." (मार्क २: ५ युएलटी)

भाषांतर रणनीती

(१) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, वाक्याचा नमुना वापरा जो त्या कार्याला व्यक्त करील.

(२) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, वाक्याचा नमुना जोडा जो त्या कार्याला व्यक्त करील.

(३) जर एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, एक क्रियापदाचे रुप वापरा जो त्या कार्याला व्यक्त करील.

भाषांतराच्या रणणीतींंच्या उदाहराणाचे लागूकरण

(१) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, वाक्याचा नमुना वापरा जो त्या कार्याला व्यक्त करील.

ती एक पुत्राला जन्म देईल,आणि तू त्याचे नाव येशु ठेव, कारण तोच त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. (मत्तय १:२१ युएलटी)

"तू त्याचे नाव येशूला नाव ठेव" हा वाक्यांश एक सूचना आहे. सामान्य निर्देशाच्या वाक्याचा नमुना वापरुन त्याचे भाषांतर केले जाऊ शकते.

ती एक पुत्राला जन्म देईल. त्याला येशू हे नाव दे, कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारेल.

(२) एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, वाक्याचा नमुना जोडा जो त्या कार्याला व्यक्त करील.

प्रभूजी, कृपा करून मला बरे करा, कारण मला माहित आहे की तुम्ही इच्छुक असल्यास तुम्ही मला बरे करण्यास सक्षम आहात. (मत्तय ८: २ यूएलटी)

"मला माहित आहे तुम्ही करू शकता" चे कार्य म्हणजे विनंती करणे. विधानाव्यतिरिक्त, एक विनंती जोडली जाऊ शकते.

प्रभुजी, मला ठाऊक आहे तुम्ही मला बरे करू शकता,. तुमची इच्छा असल्यास, कृपया तसे करा**.**

प्रभुजी, जर तुमची इच्छा असल्यास कृपा करून मला बरे करा**.** मला ठाऊक आहे तुम्ही तसे करू शकता.

(३) जर एखाद्या विधानाचे कार्य तुमच्या भाषेत योग्यप्रकारे समजले नसल्यास, एक क्रियापदाचे रुप वापरा जो त्या कार्याला व्यक्त करील.

ती एक पुत्राला जन्म देईळ, आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तो त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. (मत्तय १:२१ युएलटी)

ती एक पुत्राला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेवायला हवे, कारण तो त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.

मुला, तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. (मार्क २:५ युएलटी)

मुला, तुझ्या पापांची क्षमा केली आहे.

मुला, देवाने तुझ्या पापांची क्षमा केली आहे.