mr_obs-tn/content/39/04.md

2.9 KiB

मी आहे

म्हणजेच, “तुला सांगितले म्हणून मी आहे” किंवा, “मी मसिहा आणि देवाचा पुत्र आहे.” “मी आहे” हे देवाचे सुध्दा नाव आहे. (पहा 09-14). सहज म्हणायचे तर, “मी आहे” येशू देखील तो देव आहे असे म्हणत होता. शक्य असल्यास, हे असे भाषांतर करा की लोकांना देवाचे नाव आणि येशूचे उत्तर यात साम्य दिसेल.

देवाच्या बाजूस बसलेला

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “देवा बरोबर राज्य करणार.” कारण देवाची सर्वांवर सत्ता आहे, त्याच्याविषयी लोक तो स्वर्गात सिंहासनावर बसला आहे असे बोलतात. तो देवाच्या सिंहासनावर बसला असे म्हणत, त्याला पित्याबरोबर राज्य करण्याचा अधिकार आहे असा येशू दावा करतो.

देवाच्या बाजूस बसलेला व स्वर्गातून आलेला

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “देवाच्या बाजूस बसलेला व नंतर स्वर्गातून येणार.”

त्याने आपली वस्त्रे रागाने फाडिली

यहूदी लोक दु:ख किंवा राग व्यक्त करण्यासाठी आपल्या अंगावरील कपडे फाडत असत. जर तुमच्या भाषेत कपडे फाडणे याचा अर्थ वेगळा असेल तर त्याच्या ऐवजी हा वाकप्रचार वापरा, “त्याला अत्यंत राग आला होता.”

तुमचा निवाडा काय आहे?

म्हणजेच, “आपला निर्णय काय आहे?” किंवा, “आपण काय निर्णय घेतला आहे ते आम्हाला सांगा तो निर्दोष आहे का दोषी?” मुख्य याजक धार्मिक नेत्यांकडून आपण देवासारखे असणे ह्या येशूच्या दाव्याचा निषेध करण्यासाठी पाहत होता.