mr_obs-tn/content/28/01.md

2.3 KiB

एके दिवशी

हे वाक्यांश पूर्वी घडलेल्या घटनेविषयी सांगते, पण विशिष्ट वेळ सांगत नाही. पुष्कळ भाषांमध्ये एखादी गोष्ट खरी सांगतांना सुरुवात अशाच पद्धतीने करतात.

श्रीमंत तरुण अधिकारी

हा मनुष्य अगोदरच श्रीमंत होता आणि जरी तरुण होता तरी सत्ता असलेला राजकीय अधिकारी होता.

येशूकडे आला

म्हणजे, “येशूला येऊन भेटला.”

उत्तम गुरुजी

म्हणजे, “धार्मिक/न्यायी गुरुजी.” येशू एक केवळ कुशल गुरुजी आहे असे तो म्हणत नव्हता.

सार्वकालिक जीवन मिळावे

म्हणजे, “सार्वकालिक जीवन प्राप्त करावे” किंवा, “देवाबरोबर सर्वकाळ राहावे.” “सार्वकालिक जीवन” ह्या शब्दाचे भाषांतर 27-01  ह्यामध्ये कसे केले आहे ते पाहा आणि त्याविषयीची टीप पाहा.

मला उत्तम का म्हणतोस

येशू नाकारत नाही की तो देव आहे. परंतु, तो अधिकाऱ्याला विचारत आहे की येशू देव आहे हे तो समजत आहे का.

एकच चांगला आहे, आणि तो देव आहे

दुसऱ्या रितीने सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल, “खरोखर चांगला एकच आहे आणि तो देव आहे” किंवा, “फक्त देवच खरोखर चांगला आहे.”