mr_obs-tn/content/27/01.md

2.7 KiB

एके दिवशी

हा वाक्यांश पुर्वी घडून गेलेल्या घटनेविषयी सांगतो, पण निश्चित वेळ सांगत नाही. पुष्कळ भाषांमध्ये एखादी खरी गोष्ट सांगण्याची सुरुवात अशा पद्धतीने करतात.

यहूदी धर्मशास्त्रात पारंगत

देवाने इस्त्राएल लोकांना जे नियमशास्त्र दिले होते त्याचा अभ्यास केला व इतरांना शिकवलेला असा हा माणूस होता. तसेच इतर यहूदी नियमाचासुद्धा त्याचा अभ्यास होता.

त्याची परीक्षा घेण्याकरीता

म्हणजे, “येशू चांगले उत्तर देतो का नाही ते पाहावे म्हणून.”

सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे

म्हणजे, “देवाबरोबर सदासर्वकालचे जीवन मिळणे” किंवा, “देव मला त्याच्याबरोबर सर्वकालचे जीवन देईल” किंवा “देवापासून सर्वकालचे जीवन मिळणे.” तो शास्त्री विचारत होता की देवपित्यापासून सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी कसा किंवा काय केल्याने योग्य होईन.

सार्वकालिक जीवन

मर्त्य शरीर मेल्यानंतर देवाबरोबरचे सर्वकाळचे जीवन. सार्वकालिक जीवन शब्दासाठी महत्वाचे शब्द पान पाहा.

देवाच्या नियमशास्त्रात काय लिहीले आहे?

म्हणजे, “ह्याविषयी देवाच्या नियमशास्त्रात काय लिहीले आहे?” येशूने हा प्रश्न विचारला कारण त्याला वाटले की ह्या माणसाने विचार करावा की खरेच देवाचे नियमशास्त्र काय शिकवते.