mr_tw/bible/other/walk.md

5.0 KiB

जाणे (चाला), चालला, चालावे (चालत असणे)

व्याख्या:

"चाला" या शब्दाच्या लाक्षणिक उपयोगाचा अर्थ "जगणे" असा होतो.

  • "हनोख देवाबरोबर चालला" याचा अर्थ हनोख देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंधात राहत होता.
  • 'आत्म्याच्या प्रेरणेने चालणे' म्हणजे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात असणे, जेणेकरून आपण देवाला संतुष्ट व सन्मानपूर्वक वागू शकतो.
  • देवाच्या आज्ञेनुसार किंवा देवाच्या मार्गांनी "चालणे" ह्याचा अर्थ त्याच्या आज्ञेच्या "अज्ञापालनात राहणे" ह्याचा अर्थ "त्याच्या आज्ञांचे पालन करणे" किंवा "त्याच्या इच्छेप्रमाणे करणे" असा होतो.
  • जेव्हा देव असे म्हणतो की तो त्याच्या लोकांमध्ये "चालत" असेल, तर याचा अर्थ असा की तो त्यांच्यामध्ये राहात आहे किंवा त्यांच्याशी जवळून संवाद साधत आहे.
  • "च्या विरुद्ध चालणे" ह्याचा अर्थ काश्याच्यातरी किंवा एखाद्याच्या विरुद्धमध्ये जगणे किंवा वागणे असा होतो.
  • "च्या मागे जाणे" ह्याचा अर्थ कोणीतरी किंवा काहीतरी ला शोधणे किंवा पाठपुरावा करणे असा होतो. ह्याचा अर्थ एखादा कार्य करतो त्याच्या सारखे कार्य करणे असा होतो.

भाषांतर सूचना

  • जोपर्यंत योग्य अर्थ समजला जात आहे तोपर्यंत, "चालणे" ह्याचे शब्दशः भाषांतर करणे उत्तम आहे.
  • अन्यथा "चालणे" ह्याच्या लाक्षणिक अर्थाच्या उपयोगाचे भाषांतर "जगणे" किंवा "कृती करणे" किंवा "वागणे" असे केले जाऊ शकते.
  • "आत्म्यानुसार चालणे" या वाक्यांशाचे भाषांतर "पवित्र आत्म्याच्या आज्ञेमध्ये चालणे" किंवा "पवित्र आत्मा संतुष्ठ होईल असे वागणे" किंवा "जसे पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे देवाला आनंदित करणे" असे केले जाऊ शकते.
  • "देवाच्या आज्ञेमध्ये चालणे" ह्याचे भाषांतर "देवाच्या आज्ञेनुसार जगणे" किंवा "देवाच्या आज्ञा पाळणे" असे केले जाऊ शकते.
  • "देवाबरोबर चालला" या वाक्यांशाचे भाषांतर "त्याच्या अज्ञेंचे पालन करून आणि त्याचा आदर करत देवाबरोबरच्या घनिष्ठ संबंधात जीवन जगणे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पहाः पवित्र आत्मा, सन्मान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1869, H1979, H1980, H1981, H3212, H4108, H4109, G1330, G1704, G3716, G4043, G4198, G4748