mr_tw/bible/other/trouble.md

4.9 KiB

संकट, त्रास, दुःखी (उदासीन), त्रास देणे, संकट आणणारा, त्रासदायक

व्याख्या:

एक "संकट" हा एक जीवनातील अनुभव आहे, जो खूपच कठीण आणि त्रासदायक आहे. एखाद्यावर "संकट" आणणे म्हणजे त्या व्यक्तीला "त्रास" देणे किंवा त्याला दुःख होण्यास कारणीभूत होणे. उदासीन म्हणजे कश्याबद्दल तरी निराश किंवा फार त्रासाची भावना असणे.

  • त्रास हे शारीरिक, भावनिक, किंवा आत्मिक गोष्टी असू शकतात, ज्या एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये, बऱ्याचदा त्रास हे देवाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा काळ असतो, जो विश्वासणाऱ्यांना विश्वासामध्ये परिपक्व आणि अधिक वाढण्यास मदत करतो.
  • जुन्या करारातील शब्द "संकट" हा न्यायाला संदर्भित करतो, जो देवाला नाकारल्याबद्दल आणि अनैतिकतेबद्दल लोकसमूहांवर येतो.

भाषांतर सूचना

  • "संकट" किंवा "त्रास" ह्याचे भाषांतर "धोका" किंवा "वेदनादायक घडलेल्या गोष्टी" किंवा "छळ" किंवा "कठीण अनुभव" किंवा "दुःख" असे केले जाऊ शकते.
  • "उदासीन" या शब्दाचे भाषांतर "दुःखातून जाणे" किंवा "भयंकर दुःख जाणवणे" किंवा "काळजीत असणे" किंवा चिंतीत असणे" किंवा "दुःखी असणे" किंवा "भीतीदायक" किंवा "अस्वस्थ" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • "तिला दुःख देऊ नका" ह्याचे भाषांतर "तिला त्रास देऊ नका" किंवा "तिच्यावर टीका करू नका" असेही केले जाऊ शकते.
  • "संकटाचा दीवस" किंवा "संकटाचा काळ" या वाक्यांशाचे भाषांतर "जेंव्हा तुम्ही त्रास अनुभवता" किंवा "जेंव्हा तुमच्याबरोबर कठीण गोष्टी घडतात" किंवा "जेंव्हा देव तुमच्याबरोबर त्रासदायक गोष्टी घडवून आणतो" असे केले जाऊ शकते.
  • "त्रास करा" किंवा "संकट आणा" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "त्रासदायक गोष्टी घडवून आणण्यासाठी कारणीभूत व्हा" किंवा "अडचणी निर्माण करा" किंवा "त्यांना खूप कठीण गोष्टींचा अनुभव करावयास लावा" ह्यांचा समावेश होऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: दुःख देणे, छळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H205, H598, H926, H927, H928, H1204, H1205, H1607, H1644, H1804, H1993, H2000, H2113, H2189, H2560, H2960, H4103, H5590, H5753, H5916, H5999, H6031, H6040, H6470, H6696, H6862, H6869, H6887, H7264, H7267, H7451, H7481, H7489, H7515, H7561, H8513, G387, G1298, G1613, G1776, G2346, G2347, G2350, G2360, G2553, G2873, G3636, G3926, G3930, G3986, G4423, G4660, G5015, G5016, G5182