mr_tw/bible/other/tax.md

7.2 KiB
Raw Permalink Blame History

जकात, कर, जकात भरणारे, जकातदार

व्याख्या:

"जकात" आणि "कर" या शब्दांचा संदर्भ पैसे किंवा वस्तूंशी आहे, जे लोक त्यांच्यावर अधिकार चालवणाऱ्या शासनाला देतात. एक "जकातदार" हा शासनाचा कामगार आहे, ज्याचे काम लोकांनी शासनाला द्यायचा कर गोळा करण्याचे आहे.

  • एक कर म्हणून भरलेली रक्कम सामान्यत: एखाद्या वस्तूच्या मूल्यावर किंवा एखाद्याच्या मालमत्तेची किती किंमत असते यावर आधारित असते.
  • येशू आणि प्रेषितांच्या काळात, रोमी साम्राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने रोमी शासनाला कर देणे गरजेचे होते, ज्यामध्ये यहुद्यांचा देखील समावेश होता.
  • कर भरला नाही, तर शासन त्या व्यक्तीच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकते, जेणेकरून त्या व्यक्तीकडून देय रक्कम मिळवता येईल.
  • रोमन साम्राज्यात राहणा-या प्रत्येकाला कर भरण्यासाठी होणाऱ्या जनगणनेमध्ये गणना होण्यासाठी योसेफ आणि मरिया हे बेथेलेहेमास गेले.
  • संदर्भाच्या आधारावर "जकात" या शब्दाचे भाषांतर, "देय रक्कम" किंवा "शासनाचा पैसा" किंवा "मंदिराचा पैसा" असे केले जाऊ शकते.
  • "कर भरणे" ह्याचे भाषांतर "शासनाला पैसे देणे" किंवा "शासनासाठी पैसे मिळवणे" किंवा "देय रक्कम देणे" असे देखील केले जाऊ शकते. * "कर गोळा करणे" ह्याचे भाषांतर "शासनासाठी पैसे गोळा करणे" असे केले जाऊ शकते.
  • एक "जकातदार" हा असा मनुष्य आहे जो शासनासाठी काम करतो, आणि लोकांनी भरावयाची रक्कम गोळा करतो.
  • जे लोक रोमी शासनासाठी कर गोळा करत, ते लोकांकडून सहसा शासनाच्या गरजेपेक्षा अधिक पैश्याची मागणी करत. जकातदार जादाची रक्कम स्वतःसाठी ठेवत.
  • कारण जकातदारांनी या प्रकारे लोकांनी फसविले, म्हणून यहुदी लोक त्यांना सर्वात पापी लोकांपैकी एक मानत होते.
  • यहुदी लोक यहुदी जकातदारांना सुद्धा त्यांचे विश्वासघातकी मनात होते, कारण ते रोमी शासनासाठी काम करत होते, जे यहुदी लोकांवर जुलूम करीत होते.
  • "जकातदार आणि पापी" हा वाक्यांश नवीन करारामध्ये सामान्य अभिव्यक्ती होता, ह्यावरून असे दिसून येते की, यहुदी लोक जाकातदारांचा किती तिरस्कार करत होते.

(हे सुद्धा पहा: यहुदी, रोम, पाप,)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 34:06 तो म्हणाला, ‘‘दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. त्यांपैकी एक जकातदार व दूसरा एक धार्मिक पुढारी होता.
  • 34:07 धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, ‘‘हे देवा, मी तुला धन्यवाद देतो की मी अन्य मनुष्यांसारखा पापी नाही. जे चोरी, अन्याय, व्यभिचार करतात त्यांच्याप्रमाणे मी नाही, व हया जकातदारासारखाही नाही.”
  • 34:09 ‘‘परंतु तो जकातदार त्या धार्मिक पुढा-यापासून फार दूर उभा होता, आणि वर स्वर्गाकडेही पाहात नव्हता. त्याऐवजी, त्याने आपल्या हातांनी छाती बडवून घेतली आणि प्रार्थना केली, ‘‘देवा, मज पाप्यावर दया कर.
  • 34:10 तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘मी तुम्हाला खचित सांगतो, देवाने त्या जकातदाराची प्रार्थना ऐकून त्यास नितीमान ठरविले.
  • 35:01 एके दिवशी, त्याचे ऐकण्यास जमलेल्या अनेक जकातदार व पापी लोकांस येशू शिकवीत होता.

Strong's

  • Tax Collector: Strong's: H5065, H5674, G5057, G5058