mr_tw/bible/other/stumblingblock.md

3.2 KiB

अडखळण, अडखळण्याचा खडक

व्याख्या:

"अडखळण" किंवा "अडखळण्याचा खडक" या शब्दांचा संदर्भ, एखाद्या भौतिक वास्तूशी आहे, जी एखाद्या मनुष्याला थडकून पडण्यास कारणीभूत होते.

  • एक अडखळण हे लाक्षणिक अर्थाने अशी वस्तू आहे, जी एखाद्या मनुष्याला नैतिकदृष्ट्या किंवा आत्मिक अर्थाने पडण्यास कारणीभूत होतात.
  • लाक्षणिक अर्थाने, "अडखळण" किंवा "अडखळण्याचा खडक" हे असे काहीतरी आहे जे एखाद्याला येशूवर विश्वास ठेवण्यापासून थांबवते, किंवा जे एखाद्याला आत्मिकरित्या वाढण्यापासून थांबवते.
  • बऱ्याचदा हे पाप असते जे, एखाद्याच्या किंवा इतरांच्या जीवनामध्ये अडखळणचे काम करते.
  • काहीवेळा देव लोकांच्या मार्गात, जे त्याच्याविरुद्ध बंडखोरी करतात, अडखळण ठेवतो.

भाषांतर सूचना:

  • जर प्रकल्पित भाषेमध्ये एखादी वस्तू ज्याने सापळा सुरु होतो, असा शब्द असेल तर, त्या शब्दाचा उपयोग त्या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • या शब्दाचे भाषंतर, "दगड जो अडखळण्यास कारणीभूत होतो" किंवा "एखादी वस्तू जी एखाद्याला विश्वास करण्यापासून रोखते" किंवा "अडखळण जे संशय घेऊन येते" किंवा "विश्वासाला अडखळण" किंवा "एखादी वस्तू जी एखाद्याला पाप करावयास लावते" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अडखळणे, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4383, G3037, G4349, G4625