mr_tw/bible/other/sleep.md

3.7 KiB

झोपेत असणे, मरण पावलेत (झोपी गेलेत), झोपी गेला (मरण पावला), मरण पावले होते, झोपलेले, निजलेले, झोपतो, झोपला, झोपेत होता, झोपलेला, जागरण, निद्रावश

व्याख्या:

या शब्दांचे अनेक लाक्षणिक अर्थ आहेत ज्याचा संबंध मृत्यूशी येतो.

  • "झोपणे" किंवा "झोपेत असणे" हे कदाचित एक रूपक असू शकते, ज्याचा अर्थ "मृत असणे" असा होतो (पहा: रूपक)
  • "झोपी गेलेत" या अभिव्यक्तीचा अर्थ झोप सुरु करणे, किंवा लाक्षणिक अर्थाने मरणे असा होतो.
  • "स्वतःच्या पित्याबरोबर झोपणे" ह्याचा अर्थ स्वतःच्या पित्यासारखे मरणे, किंवा स्वतःचे पूर्वज मेले तसे मरणे असा होतो.

भाषांतर सूचना:

  • "झोपी गेलेत" ह्याचे भाषांतर, "अचानक झोपणे" किंवा "झोपण्यास सुरुवात करणे" किंवा "मरणे" असे त्याच्या अर्थाच्या आधारावर केले जाऊ शकते.
  • टीप: हे अतिशय महत्वाचे आहे की, संदर्भामध्ये ह्याचा लाक्षणिक अर्थाची अभिव्यक्ती तशीच ठेवणे, जेथे श्रोत्यांना त्या शब्दाचा अर्थ समजणे अवघड होते. उदाहरणार्थ, जेंव्हा येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की, लाजर "झोपेत" आहे, तेंव्हा त्यांनी त्यांनी असा विचार केला की, लाजर हा फक्त सामान्यपणे झीपेत आहे. या संदर्भामध्ये, "तो मेला आहे" असे ह्याचे भाषांतर करून समजणार नाही.
  • काही प्रकल्पित भाषेमध्ये, कदाचित मृत्यूसाठी किंवा मरण्यासाठी एक वेगळी अभिव्यक्ती असू शकते, त्याचा उपयोग जर "झोपणे" किंवा "झोपेत असणे" या अभिव्यक्ती समजत नसतील तर केला जाऊ शकतो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1957, H3462, H3463, H7290, H7901, H8139, H8142, H8153, H8639, G879, G1852, G1853, G2518, G2837, G5258