mr_tw/bible/other/seek.md

3.1 KiB

शोधणे (शोध घेणे), मिळवण्याचा प्रयत्न करणे (पाहणे, इच्छिणे), शोधात असणे, शोधला

व्याख्या:

"शोधणे" या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला पाहण्याचा प्रयत्न करणे असा होतो. ह्याचा भूतकाळ "शोधला" असा होतो. ह्याचा अर्थ काहीतरी करण्यासाठी "अथक परिश्रम केले" किंवा "प्रयत्न केले" असा होतो.

  • एखादी गोष्ट करण्यासाठी संधी "शोधणे" किंवा "पाहणे" ह्याचा अर्थ ती गोष्ट करण्यासाठी "वेळ काढण्याचा प्रयत्न करणे" असा होतो.
  • "यहोवाला शोधणे" ह्याचा अर्थ, "यहोवाला जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च करणे" असा होतो.
  • "संरक्षण शोधणे" ह्याचा अर्थ, "असा व्यक्ती किंवा जागा शोधण्याचा प्रयत्न करणे जो तुम्हाला धोक्यापासून वाचवू शकेल" असा होतो.
  • "न्याय शोधणे" ह्याचा अर्थ, "लोकांना योग्य आणि समान वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न करणे" असा होतो.
  • "सत्य शोधणे" ह्याचा अर्थ ""सत्य काय आहे, हे शोधण्यासाठी प्रयत्न करणे" असा होतो.
  • "कृपा शोधणे" ह्याचा अर्थ "कृपा मिळवण्याचा प्रयत्न करणे" किंवा "एखाद्याला मदत करण्यासाठी भाग पडणाऱ्या गोष्टी करणे" असा होतो.

(हे सुद्धा पहा: न्यायी, सत्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H579, H1156, H1239, H1243, H1245, H1556, H1875, H2470, H2603, H2658, H2664, H2713, H3289, H7125, H7592, H7836, H8446, G327, G1567, G1934, G2052, G2212