mr_tw/bible/other/refuge.md

5.2 KiB

आश्रय, आश्रयार्थी, निर्वासित, निवारा (तंबू), आश्रयस्थान

व्याख्या:

"आश्रय" हा शब्द सुरक्षा किंवा संरक्षण असण्याच्या स्थितीला किंवा जागेला सूचित करतो. एक "आश्रयार्थी" हा असा कोणीतरी आहे जो सुरक्षित ठिकाणच्या शोधात असतो. "निवारा" म्हणजे अशी जागा ज्यामुळे हवामान किंवा धोक्यापासून संरक्षण होते.

  • पवित्र शास्त्रामध्ये, बऱ्याचदा देवाला आश्रय म्हणून संदर्भित केले आहे, जिथे त्याचे लोक सुरक्षित, संरक्षित, आणि काळजी घेतलेले असे राहू शकतात.
  • जुन्या करारामध्ये, "आश्रयाचे नगर" या शब्दाचा संदर्भ अनेकांपैकी एका शहराशी आहे, जिथे एखाद्याला अपघाताने मारलेला एखादा व्यक्ती, बदलासाठी आपल्यावर हल्ला करणाऱ्या लोकांपासून संरक्षणासाठी तिथे जाऊ शकतो.
  • एक "निवारा" ही सहसा एखाद्या इमारतीची किंवा छताची एक भौतिक रचना असते, जे लोकांना किंवा प्राण्यांना संरक्षण देते.
  • काहीवेळा "निवारा" ह्याचा अर्थ "संरक्षण" असा होतो, जसे की, जेंव्हा लोट म्हणाला की त्याचे अतिथी त्याच्या "निवासस्थानाच्या आश्रयाखाली" होते. तो असे म्हणत होता की, ते सुरक्षित आहेत, कारण त्याच्या घरातील सदस्य म्हणून त्यांचे संरक्षण करण्याची तो जबाबदारी घेत होता.

भाषांतर सूचना

  • "आश्रय" या शब्दाचे भाषांतर "सुरक्षित जागा" किंवा "संरक्षणाचे ठिकाण" असे केले जाऊ शकते.
  • "आश्रयार्थी" हे असे लोक आहेत, ज्यांनी धोकादायक परिस्थितीतून वाचण्यासाठी त्यांची घरे सोडली आहेत, आणि ह्याचे भाषांतर "उपरा, घर नसलेले लोक" किंवा "हद्दपार केलेले" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "निवारा" या शब्दाचे भाषांतर "असे काहीतरी जे वाचवते" किंवा "संरक्षण" किंवा "सुरक्षित लोक" असे केले जाऊ शकते.
  • जर ह्याचा संदर्भ भौतिक रचनेशी आहे, तर "निवारा" ह्याचे भाषांतर "संरक्षणात्मक इमारत" किंवा "सुरक्षिततेचे घर" असे केले जाऊ शकते.
  • "सुरक्षित आश्रयस्थान मध्ये" या वाक्यांशाचे भाषांतर "सुरक्षित जागेमध्ये" किंवा "अशा जागेमध्ये जी रक्षण करेल" असे केले जाऊ शकते.
  • "निवारा शोधणे" किंवा "निवारा घेणे" किंवा "आसरा घेणे" ह्याचे भाषांतर "सुरक्षिततेचे ठिकाण शोधणे" किंवा "स्वतःला एका संरक्षित ठिकाणी ठेवणे" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2620, H4268, H4498, H4585, H4733, H4869