mr_tw/bible/other/queen.md

2.3 KiB

राणी, राण्या

व्याख्या:

एक राणी ही एकतर एखाद्या देशाची मादी शासक असते, नाहीतर एखाद्या राजाची बायको असते.

  • एस्तेरने जेंव्हा अहश्वरोष राजाबरोबर लग्न केले तेंव्हा ती परसाच्या साम्राज्याची राणी बनली.
  • राणी ईजबेल ही अहाब राजाची दुष्ट पत्नी होती.
  • शबाची राणी ही एक प्रसिद्ध शासक होती, जी शलमोन राजाला भेटायला आली होती.
  • "राजमाता" या सारखा शब्द सहसा राज्य करणाऱ्या राजाच्या आईसाठी किंवा आजीसाठी किंवा आधीच्या राजाच्या विधवा पत्नीसाठी संदर्भित केला जातो, एखाद्या राजमातेचा प्रभाव खूप असतो; उदाहरणार्थ, अथल्या हिने लोकांना मूर्तींची उपासना करण्यास प्रभावित केले.

(हे सुद्धा पहा: अहश्वेरोष, अथल्या, एस्तेर, राजा, पारस, शासक, शबा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1404, H1377, H4410, H4427, H4433, H4436, H4438, H4446, H7694, H8282, G938