mr_tw/bible/other/prostrate.md

3.3 KiB

दंडवत घालणे, पालथे पडणे

व्याख्या:

"दंडवत घालणे" या शब्दाचा अर्थ चेहरा खाली पाडून, जमिनीवर पडून राहणे.

  • एखाद्या समोर "दंडवत घालणे" किंवा "स्वतःला पालथे पडणे" ह्याचा अर्थ अचानकपणे खूप खाली वाकणे किंवा त्या व्यक्तीसमोर झुकणे.
  • सामन्यतः दंडवत घालण्याची स्थिती म्हणजे, काहीतरी अद्भुत घडल्यामुळे आश्चर्य, हे ज्या व्यक्तीसमोर नमतो, त्या व्यक्तीला आदर आणि सन्मान दर्शवितो.
  • दंडवत घालणे हा सुद्धा देवाची उपासना करण्याचा एक मार्ग आहे. जेंव्हा त्याने चमत्कार केले तेंव्हा येशूचे आभार मानण्यासाठी आणि उपासना करण्यासाठी किंवा एक महान शिक्षक म्हणून त्याचा सन्मान करण्यासाठी, लोकांनी सहसा अशा पद्धतीने प्रतिसाद दिला.
  • संदर्भावर आधारित, "पालथे पडणे" याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "खाली वाकून तोंड जमिनीकडे करून नमन करणे" किंवा "त्याच्या समोर तोंड खाली करून त्याची उपासना करणे" किंवा "आश्चर्यचकित होऊन जमिनीपर्यंत वाकून नमन करणे" किंवा "उपासना करणे" यांचा समावेश होतो.
  • "स्वतःला दंडवत घालू न देणे" या वाक्यांशाचे भाषांतर "आराधना न करणे" किंवा "अराधनेमध्ये तोंड खालच्या बाजूस न करणे" किंवा "खालच्या बाजूस उपासनेसाठी वाकणार नाही" असे केले जाऊ शकते.
  • "ला दंडवत करणे" याचे भाषांतर "उपासना" किंवा "च्या समोर वाकणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: भीतीयुक्त आदर, वाकणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5307, H5457, H6440, H6915, H7812