mr_tw/bible/other/prosper.md

4.4 KiB

यश, उन्न्नती होणे, कल्याण करणे, भरभराट, यशस्वी

व्याख्या:

"यश" या शब्दाचा सामान्यपणे संदर्भ व्यवस्थित राहण्याशी आहे आणि त्याचा संदर्भ शारीरिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या भरभराट होण्याशी सुद्धा असू शकतो. जेंव्हा लोक किंवा देश "यशस्वी" असतात, त्याचा अर्थ ते श्रीमंत असतात आणि ते यशस्वी होण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्याजवळ असते. ते "भरभराट" अनुभवत असतात.

  • "यशस्वी" या शब्दाचा उल्लेख सहसा पैसा आणि मालमत्ता जवळ असणे किंवा लोकांनी चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी निर्माण करण्याच्या संदर्भात करतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "यशस्वी" या शब्दामध्ये चांगले आरोग्य आणि मुले असण्याचा आशीर्वाद ह्यांचा समावेश होतो.
  • एक "यशस्वी" शहर किंवा देश असा आहे, ज्याच्याकडे अनेक लोक आहेत, अन्नाचे भरपूर उत्पादन आहे, आणि असे व्यवसाय आहेत जे पुष्कळ पैसा आणतात.
  • पवित्र शास्त्र शिकवते की, जेंव्हा मनुष्य देवाचे शिक्षण पाळतो, तेंव्हा तो त्याची अत्मिकदृष्ट्या भरभराट होते. तो आनंद आणि शांतीच्या अशीर्वादांचा अनुभव करतो. देव लोकांना नेहमी भौतिक संपत्ती देत नाही, पण तो लोकांना नेहमी आत्मिक यश देतो जेव्हा ते त्याच्या मार्गाचे अनुसरण करतात.
  • संदर्भाच्या आधारावर, "यश" या शब्दाचे भाषांतर "आध्यात्मिकरित्या यशस्वी" किंवा "देवाद्वारे आशीर्वादित असलेला" किंवा "चांगल्या गोष्टींना अनुभवणारा" किंवा "चांगले जगणारा" असे केले जाऊ शकते.
  • "यशस्वी" या शब्दाचे भाषांतर "सफल" किंवा "श्रीमंत" किंवा "आध्यात्मिकरित्या फलदायी" असेही केले जाऊ शकते.
  • "भरभराट" या शब्दाचे भाषांतर "कल्याण" किंवा "संपत्ती" किंवा "यश" किंवा "विपुल आशीर्वाद" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: आशीर्वाद, फळ, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1129, H1767, H1878, H1879, H2428, H2896, H2898, H3027, H3190, H3444, H3498, H3787, H4195, H5381, H6500, H6509, H6555, H6743, H6744, H7230, H7487, H7919, H7951, H7961, H7963, H7965, G2137