mr_tw/bible/other/prison.md

3.7 KiB

तुरुंग, कैदी, बंदिवान, कैदेत टाकणे, तुरुंगात टाकले, शिक्षा

व्याख्या:

"तुरुंग" या शब्दाचा संदर्भ, अशा ठिकाणाशी येतो, जेथे कैद्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून ठेवले जाते. एक "कैदी" असा व्यक्ती आहे, ज्याला तुरुंगात ठेवले जाते.

  • एखाद्या व्यक्तीला त्याच्यावर खटला सुरु असताना देखील तुरुंगात ठेवले जाते.
  • "कैदेत टाकणे" या शब्दाचा अर्थ "तुरुंगात ठेवणे" किंवा "बंदिवासात ठेवणे" असा होतो.
  • अनेक संदेष्ट्ये आणि इतर देवाचे सेवक, ह्यांना त्यांनी काहीही केले नव्हते, तरी सुद्धा त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

भाषांतर सूचना

  • "तुरुंगासाठी" दुसरा शब्द "कैद" असा होतो.
  • या शब्दाचे भाषांतर, "अंधारकोठडी" असे केले जाऊ शकते, जेथे तुरुंगाचा संदर्भ बहुदा करून जमिनीखाली, किंवा मुख्य भागाच्या खाली किंवा इतर इमारतीच्या खाली आलेला आहे.
  • "कैदी" या शब्दाचा संदर्भ, सामान्यपणे अशा लोकांशी येतो, ज्यांना शत्रूंनी बंदी बनवून, त्यांच्या इच्छेविरुद्ध एखाद्या ठिकाणी नेऊन ठेवले आहे. ह्याचे भाषांतर करण्याचा अजून एक मार्ग कदाचित "बंदिवान" असा होऊ शकतो.
  • "कैदेत टाकणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "कैदी म्हणून ठेवणे" किंवा "बंदिवासात ठेवणे" किंवा "बंदी म्हणून धरून ठेवणे" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: बंदिवान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H612, H613, H615, H616, H631, H1004, H1540, H3608, H3628, H3947, H4115, H4307, H4455, H4525, H4929, H5470, H6115, H6495, H7617, H7622, H7628, G1198, G1199, G1200, G1201, G1202, G1210, G2252, G3612, G4788, G4869, G5084, G5438, G5439