mr_tw/bible/other/partial.md

2.5 KiB

कमी लेखणे (पक्षपाती), पक्ष घेणे, पक्षपात

व्याख्या:

"पक्ष घेणे" किंवा "पक्षपात दाखवणे" ह्याचा संदर्भ एखाद्या व्यक्तीला इतर व्यक्तींपेक्षा अधिक महत्व देण्याची निवड करण्याशी येतो.

  • हे पक्षपातीपणा दाखवण्यासारखेच आहे, ज्याचा अर्थ एखाद्याला इतरांपेक्षा अधिक चांगली वागणूक देणे असा होतो.
  • सहसा पक्षपात किंवा पक्षपातीपणा अशा लोकांच्या बद्दल दाखवला जातो, जे लोक इतर लोकांपेक्षा अधिक श्रीमंत किंवा आधीक प्रसिद्ध आहेत.
  • पवित्र शास्त्र त्याच्या लोकांना अशा सूचना देते की, जे लोक श्रीमंत आहेत, किंवा उंच दर्जाचे आहेत त्यांच्याप्रती पक्षपात किंवा पक्षपातीपणा दाखवू नका.
  • पौलाचे रोमकरांसच्या पत्रात, पौल शिकवतो इ, देव लोकांचा न्याय समानतेने करतो, तो त्यात पक्षपात करीत नाही.
  • याकोबाचे पुस्तक असे शिकवते की, एखाद्याला तो केवळ श्रीमंत आहे म्हणून चांगली जागा देणे किंवा चांगली वागणूक देणे हे चुकीचे आहे.
  • हे सुद्धा पहा: मर्जी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5234, H6440, G991, G1519, G2983, G4299, G4383