mr_tw/bible/other/mock.md

5.3 KiB
Raw Permalink Blame History

थट्टा करणे, चेष्टेने, उपहास करणे, चेष्टा करणे, निंदक, थट्टाखोर, उपहास, थट्टा केली, थट्टा करतील, थट्टा केली

व्याख्या:

"थट्टा करणे," "उपहास" आणि "चेष्टा करणे" हे शब्द, एखाद्याची मजा करणे, विशेषत: क्रूर मार्गाने; ह्यासाठी संदर्भित केले जातात.

  • चेष्टा करणे ह्यामध्ये सहसा लोकांच्या शब्दाचे अनुकरण करणे किंवा त्यांना लाज वाटण्याच्या हेतूने कृती करणे किंवा त्यांच्यासाठी तिरस्कार दाखवणे ह्यांचा समावेश होतो.
  • रोमी सैनिकांनी येशूचा उपहास आणि थट्टा केली, जेंव्हा त्यांनी त्याला जांभळा झगा घातला आणि ते त्याचा सन्मान करतात असा आव आणला.
  • एका तरुण लोकांच्या समूहाने अलीशाची थट्टा आणि उपहास केला, जेंव्हा त्यांनी त्याच्या टक्कल डोक्याची चेष्टा केली आणि त्याला टकल्या नावाने बोलवले.
  • "उपहास" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणे असे देखील असू शकते, जे विश्वासू किंवा महत्त्वपूर्ण मानले जात नाही.
  • एक "थट्टेखोर" म्हणजे जो सतत विनोद करतो आणि उपहास करतो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:12 यशयाने भविष्य केले होते की लोक मसिहावर थुंकतील, त्याची थट्टा करतील व त्यास फटके मारतील.
  • 39:05 सर्व यहूदी पुढा-यांनी महायाजकास उत्तर दिले, ‘‘तो मरणदंडास पात्र आहे! मग त्यांनी येशूच्या डोळयांवर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्यास मारिले व त्याची थट्टा उडविली.
  • 39:12 रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!
  • 40:04 येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले. * त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय?
  • 40:05 यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरुन खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.

Strong's

  • Strong's: H1422, H2048, H2049, H2778, H2781, H3213, H3887, H3931, H3932, H3933, H3934, H3944, H3945, H4167, H4485, H4912, H5058, H5607, H5953, H6026, H6711, H7046, H7048, H7814, H7832, H8103, H8148, H8437, H8595, G1592, G1701, G1702, G1703, G2301, G2606, G3456, G5512