mr_tw/bible/other/mediator.md

2.6 KiB

मध्यस्थ

व्याख्या:

एक मध्यस्थी हा असा मनुष्य आहे, जो दोन किंवा अधिक लोकांच्यामधील दुमत किंवा वादविवाद मिटवण्यास मदत करतो. तो त्यांच्यामध्ये समेत घडवून आणण्यास मदत करतो.

  • लोकांनी पाप केल्यामुळे, ते देवाचे शत्रू झाले, जे त्याच्या क्रोधाचे आणि शिक्षेच्या पात्र होते. पाप केल्यामुळे, देव आणि त्याच्या लोकांच्यातील नातेसंबंध तुटले होते.
  • येशू हा देव जो पिता आणि त्याचे लोक यांच्यामधील मध्यस्थी आहे, आणि तो लोकांच्या पापाची भरपाई म्हणून स्वतःचा प्राण देऊन तुटलेले नातेसंबंध पुनःस्थापित करत आहे.

भाषांतर सूचना:

  • मध्यस्थी ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "व्यक्तींच्या मध्ये जाणे" किंवा "समेट घडवणारा" किंवा "शांती आणणारा मनुष्य" ह्यांचा समावेश होतो.
  • या शब्दाची, "याजक" हा शब्द कसा भाषांतरित केला जातो ह्याच्याशी तुलना करा. जर "मध्यस्थी" हा शब्द वेगळ्या शब्दाने भाषांतरित केला तर हे सर्वोत्तम राहील.

(हे सुद्धा पहा: याजक, समेट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3887, G3312, G3316