mr_tw/bible/other/lowly.md

2.0 KiB

दीन, नम्र, नम्रतेने

व्याख्या:

"दीन" आणि "नम्रतेने" या शब्दांचा संदर्भ गरीब असणे किंवा खालची स्थिती असण्याशी आहे. दीन असणे ह्याचा अर्थ नम्र असणे.

  • येशूने स्वतःला मनुष्य होण्याकरिता आणि दुसऱ्यांची सेवा करण्याकरिता दीन केले.
  • त्याचा जन्म नम्रपणे झाला, कारण तो महालांमध्ये न जन्मता अशा जागी जन्माला आला, जिथे प्राण्यांना ठेवले जाते.
  • दीन वृत्ती असणे हे अहंकारी असण्याच्या विरोधमध्ये आहे.

"दीन" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "नम्रता" किंवा "खालची स्थिती" किंवा "महत्वाचा नसलेला" ह्यांचा समावेश होतो.

  • "नम्रपणे" या शब्दाचे भाषांतर "नम्रता" किंवा "कमी महत्व असलेला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: नम्र अहंकार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6041, H6819, H8217, G5011, G5012, G5014