mr_tw/bible/other/joy.md

7.5 KiB

आनंद, आनंदीत, आनंदाने, आनंदात, तृप्त होणे, आनंद करणे, अत्यानंद, हर्ष, हर्षित

व्याख्या:

देवाकडून येणारी सुखावण्याची किंवा अतिशय समाधानाची भावना म्हणजे आनंद होय. "आनंदित" हा संबंधित शब्द, अशा मनुष्याचे वर्णन करतो, जो खूप खुष आहे आणि तो अतिशय आनंदाने भरलेला आहे.

  • जेंव्हा एखादी व्यक्तीला आनंद वाटतो, तेंव्हा तो जे काही अनुभवत आहे ते खूपच चांगले आहे, अशी त्याला खोल जाणीव असते.
  • देवच एक आहे, जो खरा आनंद देऊ शकतो.
  • आनंद असणे हे सुखद परिस्थितीवर अवलंबून नाही. जेंव्हा लोकांच्या जीवनात खूप कठीण गोष्टी घडत असतात, तेंव्हा सुद्धा देव त्यांना आनंद देऊ शकतो.
  • काहीवेळा ठिकाणांचे वर्णन आनंदित असे केले जाते, जसे की, घरे, किंवा शहरे. ह्याचा अर्थ असा की, जे लोक तिथे राहतात ते आनंदी असतात.

"अत्यानंद" या शब्दाचा अर्थ, आनंदाने आणि आनंदीपणाने भरलेले असणे असा होतो.

  • या शब्दाचा संदर्भ सहसा देवाने केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल खूप आनंदी असण्याशी आहे.
  • ह्याचे भाषांतर "खूप आनंदी असणे" किंवा "अतिशय आनंदित असणे" किंवा "आनंदाने भरलेले असणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा मरिया म्हणाली की, "माझा जीव प्रभु माझा तारणारा याच्या ठायी हर्ष पावत आहे" या तिच्या म्हणण्याचा अर्थ "देव माझा तारणारा याने मला खूप आनंदित केले आहे" किंवा "देव माझा तारणारा, याने जे काही माझ्या जीवनात केले आहे, त्यामुळे मी खूप आनंदित आहे" असा होतो.

भाषांतर सूचना

  • "आनंद" या शब्दाचे भाषांतर "खूप आनंदी" किंवा "खुश" किंवा "महान आनंद" असे केले जाऊ शकते.
  • ह्याचे भाषांतर "खूप आनंदी असणे" किंवा "अतिशय आनंदित असणे" किंवा "आनंदाने भरलेले असणे" असे केले जाऊ शकते.
  • एक मनुष्य, जो आनंदित आहे त्याचे वर्णन "खूप आनंदी" किंवा "खुश" किंवा "अतिशय आनंदी" असे केले जाऊ शकते.
  • "आनंदाने घोषणा करा" या वाक्यांशाचे भाषांतर "अशा प्रकारे घोषणा करा की, ह्यावरून तुम्ही खूप आनंदी आहात हे दिसून येईल" असे केले जाऊ शकते.
  • एक "आनंदित शहर" किंवा "आनंदित घर" ह्याचे भाषांतर "असे शहर जिथे आनंदित लोक राहतात" किंवा "आनंदित लोकांनी भरलेले घर" किंवा "असे शहर, ज्यातील लोक खूप आनंदी आहेत" असे केले जाऊ शकते. (पहा: लक्षण

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 33:07 ‘‘खडकाळ जमीन म्हणजे अशी व्यक्ती जो देवाचे वचन ऐकूतो आणि आनंदाने स्वीकारतो.
  • 34:04 ‘‘देवाचे राज्य शेतामध्ये कुणीतरी लपवून ठेवलेल्या गुप्त खजिन्यासारखे आहे. दुस-या मनुष्यास ते सापडले व त्याने ते पुन्हा पुरुन ठेवले. त्याला एवढा आनंद झाला की त्याने आपली सर्व संपत्ती विकून आलेल्या पैशांनी ते शेत विकत घेतले.
  • 41:07 हे ऐकून स्त्रियांना फार भिती वाटली व आनंदही झाला. त्यांनी धावत जाऊन शिष्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली.

Strong's

  • Strong's: H1523, H1524, H1525, H1750, H2302, H2304, H2305, H2654, H2898, H4885, H5937, H5938, H5947, H5965, H5970, H6342, H6670, H7440, H7442, H7444, H7445, H7797, H7832, H8055, H8056, H8057, H8342, H8643, G20, G21, G2165, G2167, G2620, G2744, G2745, G3685, G4640, G4796, G4913, G5463, G5479