mr_tw/bible/other/heal.md

6.7 KiB
Raw Permalink Blame History

बरे करणे, बरे केले, मुक्त केले, आरोग्य, बरे करणारा, बरेपणा (सुखरूप), निरोगी, आजारी (रोगी)

व्याख्या:

"बरे करणे" आणि "मुक्त करणे" या दोन्ही शब्दांचा अर्थ आजारी, जखमी किंवा अक्षम व्यक्तीस पुन्हा निरोगी होण्यासाठी कारणीभूत ठरणे असा होतो.

  • एक व्यक्ती जो "बारा झाला" किंवा "मुक्त झाला" असा व्यक्ती "चांगला झाला" किंवा "निरोगी बनला."
  • रोग नैसर्गिकरीत्या बरे होऊ शकतात, कारण देवाने आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या जखमा आणि आजार बरे करण्याची क्षमता दिली आहे. या प्रकारचा उपचार सहसा हळूहळू घडतो.
  • तथापि, विशिष्ठ परिस्थिती, जसे की, आंधळे होणे किंवा अर्धांगवायू होणे आणि काही विशिष्ठ आजार जसे की, कुष्ठरोग असे आजार स्वतःच बरे होत नाहीत. जेव्हा लोक या गोष्टींपासून बरे झाले, तेव्हा हा एक चमत्कार होता जो सहसा अचानक होतो.
  • उदाहरणार्थ, येशूने अनेक लोकांना जे आंधळे, किंवा लंगडे किंवा रोगी होते, त्यांना बरे केले आणि ते लगेच बरे झाले.
  • प्रेषितांनीसुद्धा लोकांना चमत्कारिक पद्धतीने बरे केले, जसे की, जेंव्हा पेत्राने एका लंगड्या मनुष्याला लगेच चालण्यास सक्षम केले.

(हे सुद्धा पहा चमत्कार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:14 एक चमत्कार शत्रुचा सेनापती नामान, याच्यासाठी झाला, त्याला एक भयंकर चर्मरोग होता. त्याने अलीशाविषयी ऐकले होते म्हणून तो त्याच्याकडे गेला व आपणास बरे करा अशी विनंती केली.
  • 21:10 त्याने हेही सांगितले की मसिहा आजारी आंधळया, मुक्या, बहि-यांस व लंगडयांस बरे करील.
  • 26:06 येशू पुढे म्हणला, ‘‘आणि अलीशा संदेष्टयाच्या काळामध्ये इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते. परंतू अलीशाने त्यांपैकी कोणालाही बरे केले नाही. त्याने फक्त नामानाचा कुष्ठरोग बरा केला, तो इस्राएलाच्या शत्रूंचा सेनापती होता.
  • 26:08 त्यांनी त्याच्याकडे अनेक आजारी, अपंग, आंधळे ,पांगळे, बहिरे, व मुके लोक घेऊन आले आणि येशून त्यांना बरे केले.
  • 32:14 तिने ऐकले होते की येशूने अनेक रोग्यांना बरे केले आहे आणि ती म्हणाली, ‘‘मला खात्री आहे की, जर मी केवळ येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, तरीही बरी होईन!
  • 44:03 लगेच तो पांगळा मनुष्य बरा झाला, तो चालू लागला व तो उड्या मारत देवाची स्तुती करू लागला.
  • 44:08 पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे.
  • 49:02 येशूने अनेक चमत्कार करून आपण देव असल्याचे प्रमाण पटवून दिले. * तो पाण्यावर चालला, वादळ शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, दुष्टात्म्यांना बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.

Strong's

  • Strong's: H724, H1369, H1455, H2280, H2421, H2896, H3444, H3545, H4832, H4974, H7495, H7499, H7500, H7725, H7965, H8549, H8585, H8644, H622, G1295, G1743, G2322, G2323, G2386, G2390, G2392, G2511, G3647, G4982, G4991, G5198, G5199