mr_tw/bible/other/harp.md

2.0 KiB

वीणा, विणांचा, वीणावादक

व्याख्या:

वीणा एक तंतुवाद्य उपकरण आहे, ज्यामध्ये उभ्या तारांसह मोठी खुली रचना असते.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, देवदारूच्या वृक्षाचा उपयोग वीणा आणि इतर संगीताची उपकरणे बनवण्यासाठी केला जात असे.
  • वीणा सहसा हातामध्ये धरून चालताना वाजवितात.
  • पवित्र शास्त्रामधील अनेक ठिकाणी, विणांचा उल्लेख देवाची स्तुती आणि उपासना करण्यासाठीचे उपकरण म्हणून केला जात होता.
  • दावीदाने अनेक स्तोत्रे लिहिली, जी वीणेच्या संगीतावर गायिली जाऊ शकतात.
  • त्याने शौल राजासाठी, त्याला त्रास देणाऱ्या आत्म्यापासून शांती मिळण्यासाठी सुद्धा वीणा वाजवली.

(हे सुद्धा पहा: दावीद, देवदारु, स्तोत्र, शौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3658, H5035, H5059, H7030, G2788, G2789, G2790