mr_tw/bible/other/fig.md

2.6 KiB

अंजीर

व्याख्या:

अंजीर हे छोटे, मऊ, गोड फळ आहे जे झाडावर वाढते. जेंव्हा पिकते, तेंव्हा या फळाला रंगांची विविधता असते, ज्यामध्ये तपकिरी, पिवळा, किंवा जांभळ्या रंगांचा समावेश होतो.

  • अंजिराचे झाड 6 मीटरपर्यंत उंच वाढते आणि त्याची मोठी पाने आरामदायक सावली प्रदान करतात. हे फळ 3-5 सेंटीमीटर लांब असते.
  • आदाम आणि हव्वा ह्यांनी पाप केल्यानंतर, अंजिराच्या झाडांच्या पानांची वस्त्रे करून स्वतःला गुंडाळली.
  • अंजीराला कच्चे, शिजवून किंवा कोरडे खाऊ शकतो. लोक त्यांचे बारीक तुकडे करून आणि त्यांना केकवर लावून नंतर सुद्धा खातात.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, अंजीर हे अन्नाचा आणि पैश्याचा स्त्रोत म्हणून प्रसिद्ध होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, अंजिराच्या फळांनी भरलेल्या झाडांची उपस्थिती हे भरभराटीचे चिन्ह असल्याचा उल्लेख केला आहे.
  • बऱ्याच वेळा येशूने अंजिराच्या झाडांचा उपयोग, त्याच्या शिष्यांना आत्मिक सत्य शिकवण्यासाठी उदाहरणादाखल केला.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1061, H1690, H6291, H8384, G3653, G4808, G4810