mr_tw/bible/other/falsewitness.md

3.2 KiB

भ्रष्ट साक्षी, खोटी अफवा, खोटी साक्ष, खोटा साक्षी, खोटे साक्षी

व्याख्या:

"खोटा साक्षी" आणि "भ्रष्ट साक्षी" या शब्दांचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो, जो एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो, सहसा एखाद्या औपचारिक बैठकीत, जसे की, न्यायालय.

  • "खोटी साक्ष" किंवा "खोटी अफवा" म्हणजे प्रत्यक्षात जे खोटे बोलले गेले.
  • "खोटी साक्ष धारण करणे" याचा अर्थ एखाद्याबद्दल खोटे बोलणे किंवा खोटी अफवा पसरवणे.
  • पवित्र शास्त्रामध्ये अनेक अहवाल दिलेले आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा होण्यासाठी किंवा तो व्यक्ती मारला जाण्यासाठी, अनेक खोटे साक्षी उभे केले गेले.

भाषांतर सूचना:

  • "खोटी साक्ष धारण करणे" किंवा "खोटी साक्ष देणे" ह्याचे भाषांतर, "खोटे सांगणे" किंवा "एखाद्याबद्दल खोटा अहवाल देणे" किंवा "एखाद्याविरुद्ध खोटे बोलणे" किंवा "खोटे बोलणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा "खोटा साक्षी" एखाद्या व्यक्तीला संदर्भित करते, तेंव्हा त्याचे भाषांतर "जो व्यक्ती खोटे बोलतो तो" किंवा "असा व्यक्ती जो खोटी साक्ष देतो" किंवा "असा व्यक्ती जो, ज्या गोष्टी खऱ्या नाहीत त्या सांगतो" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: साक्ष, सत्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5707, H6030, H7650, H8267, G1965, G3144, G5571, G5575, G5576, G5577