mr_tw/bible/other/face.md

7.3 KiB

मुख (चेहरा), चेहरे, चेहऱ्याचा, तोंड, चेहऱ्याचा, पालथे

व्याख्या:

"मुख" या शब्दाचा शब्दशः संदर्भ, एखाद्या मनुष्याच्या डोक्याच्या पुढील भागाशी आहे. या शब्दाचे अनेक लाक्षणिक अर्थ देखील आहेत.

  • "तुझे मुख" ही अभिव्यक्ती नेहमीच "तू" असे म्हणण्याचा लाक्षणिक पद्धत आहे. त्याचप्रमाणे, "माझा चेहरा" या शब्दाचा अर्थ अनेकदा "मी" किंवा "मला" असा होतो.
  • भौतिक अर्थाने, एखाद्याकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे "मुख" करणे ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या दिशेने बघणे.
  • "एकमेकांकडे मुख करणे" ह्याचा अर्थ "एकमेकांकडे थेट बघणे" असा होतो.
  • "समोरासमोर" असणे, ह्याचा अर्थ दोन लोक एकमेकांकडे जवळच्या अंतरावरून पाहत आहेत.
  • जेंव्हा येशूने "त्याचा चेहरा यरुशलेमेस जाण्याकडे रोखून धरला," तेंव्हा त्याचा अर्थ त्याने खूप खंबीरपणे तिकडे जाण्याचा निर्णय घेतला असा होतो.
  • लोकांच्या किंवा शहराच्या "विरुद्धमध्ये मुख करणे" ह्याचा अर्थ, त्या शहराला किंवा मनुष्यांना तिथून पुढे मदत न करण्याचा किंवा नाकारण्याचा खंबीरपणाने निर्णय घेणे असा होतो.
  • "जमिनीचा चेहरा" या वाक्यांशाचा संदर्भ पृथ्वीच्या पृष्ठभागाशी आहे आणि सहसा सामान्यपणे संपूर्ण पृथ्वीला संदर्भित करतो. उदाहरणार्थ, "पृथ्वीचा चेहरा झाकणारा दुष्काळ" ह्याचा संदर्भ, पृथ्वीवरील बहुतेक लोकांना प्रभावित करणाऱ्या एक व्यापक दुष्काळाशी आहे.
  • "तुझा चेहरा तुझ्या लोकांपासून लपवू नको" या लाक्षणिक अभिव्यक्तीचा अर्थ "तुझ्या लोकांना नाकारू नको" किंवा "तुझ्या लोकांना सोडू नको" किंवा "तुझ्या लोकांची काळजी घेणे बंद करू नको" असा होतो.

भाषांतर सूचना

  • शक्य असेल तर, प्रकल्पित भाषेत ही अभिव्यक्ती तशीच ठेवणे किंवा समान अर्थाच्या अभिव्यक्तीचा उपयोग करणे, हे सर्वोत्तम ठरेल.
  • "चेहरा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "च्या कडे वळणे" किंवा "च्या कडे थेट बघणे" किंवा "च्या चेहऱ्याकडे बघणे" असे केले जाऊ शकते.
  • "समोरासमोर" या अभिव्यक्तीचे भाषांतर "खूप जवळ" किंवा "च्या अगदी समोर" किंवा "च्या सानिध्यात" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "त्याच्या चेहऱ्यासमोर" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्याच्या पुढे" किंवा "त्याच्या समोर" किंवा "त्याच्या आधी" किंवा "त्याच्या सानिध्यात" असे केले जाऊ शकते.
  • "त्याच्या चेहऱ्याकडे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "च्या दिशेने प्रवास सुरु करणे" किंवा "खंबीरपणे तिकडे जाण्याचे मान बनवणे" असे केले जाऊ शकते.
  • "च्या पासून त्याचा चेहरा लपवणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "च्या पासून दूर जाणे" किंवा "मदत किंवा संरक्षण थांबवणे" किंवा "नाकारणे" असे केले जाऊ शकते.
  • एखाद्या शहराच्या किंवा लोकांच्या "विरोधमध्ये चेहरा करणे" ह्याचे भाषांतर "त्याच्याकडे रागाने आणि दोष देणे" किंवा "स्वीकार करण्यास नकार देणे" किंवा "नाकारण्याचा निर्णय घेणे" किंवा "दोष देणे आणि नाकारणे" किंवा "निर्णय देणे" असे केले जाऊ शकते.
  • "त्यांच्या चेहऱ्यावर बोलणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "ते त्यांना थेट बोलणे" किंवा "ते त्यांना त्याच्या उपस्थितीत सांगणे" किंवा "ते त्यांना व्यक्तिगत सांगणे" असे केले जाऊ शकते.
  • "जमिनीच्या चेहऱ्यावर" या अभिव्यक्तीचे भाषांतर "संपूर्ण जमिनीवर" किंवा संपूर्ण पृथ्वीच्यावर" किंवा "संपूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्यांच्यावर" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H600, H639, H5869, H6440, H8389, G3799, G4383, G4750