mr_tw/bible/other/earth.md

3.5 KiB

पृथ्वी, मातीचे, पृथ्वीवरील (संसारिक)

व्याख्या:

"पृथ्वी" या शब्दाचा संबंध मनुष्यांच्या जगाशी आहे, ज्यात ते इतर सर्व प्रकारच्या जीवांबरोबर राहतात.

  • "पृथ्वी" हा शब्द भूमीला झाकणारा भूभाग किंवा मातीच्या संदर्भात देखील येतो.
  • हा शब्द सहसा लाक्षणिक अर्थाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात वापरला जातो. (पहा: मेटॉनीमी
  • "पृथ्वी आनंदाने भरुन जाईल" आणि "तो पृथ्वीचा न्याय करेल" या अभिव्यक्ती या सज्ञेंचे लाक्षणिक अर्थाच्या उपयोगाचे उदाहरणे आहेत.
  • "संसारिक" या शब्दाचा संदर्भ आत्मिक गोष्टींच्या विरोधमधील भौतिक गोष्टींशी आहे.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर, स्थनिक भाषेतील किंवा जवळच्या राष्ट्रीय भाषेतील अशा शब्दाने किंवा वाक्यांशाने केला जाऊ शकते, जे पृथ्वीग्रह ज्यावर आपण राहतो याला सूचित करते.
  • संदर्भावर आधारित, "पृथ्वी" या शब्दाचे भाषांतर "जग" किंवा "भूमी" किंवा "धूळ" किंवा "माती" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा लाक्षणिक अर्थाचा वपर केला जातो, "पृथ्वी" चे भाषांतर "पृथ्वीवरील लोक" किंवा "पृथ्वीवर राहणारे लोक" किंवा "पृथ्वीवर असणारे सर्व" असे केले जाऊ शकते.
  • "मातीचे" याचे भाषांतर "भौतिक" किंवा "या पृथ्वीवरील गोष्टी" किंवा "दृश्यमान" या पद्धतींनी सुद्धा केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: आत्मा, जग)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H127, H772, H776, H778, H2789, H3007, H3335, H6083, H7494, G1093, G1919, G2709, G2886, G3625, G3749, G4578, G5517