mr_tw/bible/other/disperse.md

3.0 KiB

पांगवणे, पांगलेले

व्याख्या:

"पांगवणे" किंवा "पांगलेले" या शब्दांचा संदर्भ लोकांना किंवा वस्तूंना अनेक दिशेने विखुरले जाणे.

  • जुन्या करारामध्ये, जेंव्हा देव लोकांना पांगवण्याविषयी बोलतो, तेंव्हा तो लोकांना वेगळे करून त्यांना एकमेकांपासून दूर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास कारणीभूत होतो. त्याने असे त्यांना शिक्षा देण्यासाठी केले. कदाचित पंगलेले असणे, हे त्यांना पश्चात्ताप करण्यास आणि परत देवाची उपासना करण्यास मदत करेल.
  • "पांगलेले" या शब्दाचा उपयोग नवीन करारामध्ये ख्रिस्ती लोकांसाठी केला, ज्यांना छळापासून सुटका करून घेण्यासाठी, त्यांची घरे सोडावी लागली आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले.
  • "पांगापांग होणे" या वाक्यांशाचे भाषांतर "अनेक वेगवेगळ्या भागातील विश्वासणारे" किंवा "लोक जे वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये राहण्यासाठी दूर गेले" असे केले जाऊ शकते.
  • "पांगलेले" या शब्दाचे भाषांतर "अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणे" किंवा "परदेशात विखुरलेले" किंवा "वेगवेगळ्या देशामध्ये राहण्यासाठी दूर जाण्यास भाग पाडलेले" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वासू, छळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2219, H4127, H5310, H6327, H6340, H6504, H8600, G1287, G1290, G4650