mr_tw/bible/other/declare.md

3.3 KiB

जाहीर करणे, सांगितले, जाहीर केले, जाहीरपणे सांगणे, घोषणा

व्याख्या:

"जाहीर करणे" आणि "घोषणा" या शब्दांचा संदर्भ, बऱ्याचदा एखाद्या गोष्टीवर भर देऊन, औपचारिक किंवा सार्वजनिक विधान करण्याशी येतो.

  • एक "घोषणा" ही, जे घोषित केले जाते त्याच्या महत्वावर फक्त भर देत नाही, तर जो घोषणा करत आहे त्याकडे लक्ष वेधून घेते.
  • उदाहरणार्थ, जुन्या करारात, देवाकडून आलेल्या संदेशाला बऱ्याचदा "यहोवाची घोषणा" किंवा " हे यहोवाने घोषित केले आहे" असे उद्धृत केले जाते. हो अभिव्यक्ती या गोष्टीवर भर देते की, हे यहोवा स्वतः बोलला आहे. हा संदेश यहोवाकडून आलेला आहे, हे तथ्य तो संदेश किती महत्वाचा आहे हे दाखवते.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "जाहीर करणे" या शब्दाचे भाषांतर, "घोषणा करणे" किंवा "सार्वजनिक सांगणे" किंवा "मजबुतपणे सांगणे" किंवा "ठामपणे सांगणे" असे केले जाऊ शकते.
  • "घोषणा" या शब्दाचे भाषांतर "विधान" किंवा "घोषणा करणे" असे केले जाऊ शकते.
  • "ही यहोवाची घोषणा आहे" या वाक्यांशाचे भाषांतर, "हे यहोवाने घोषित केलेले आहे" किंवा "हे यहोवाने सांगितले आहे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: घोषणा करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H262, H559, H560, H816, H874, H952, H1696, H3045, H4853, H5002, H5042, H5046, H5608, H6567, H6575, H7121, H7561, H7878, H8085, G312, G394, G518, G669, G1107, G1213, G1229, G1335, G1344, G1555, G1718, G1732, G1834, G2097, G2511, G2605, G2607, G3140, G3670, G3724, G3822, G3853, G3870, G3955, G5319, G5419