mr_tw/bible/other/cutoff.md

3.9 KiB

कापला जाणे (बाहेर टाकणे), कापून टाकतो, नाहीसे करणे

व्याख्या:

अभिव्यक्ती "कापलेला असणे" ही एक अभिव्यक्ती आहे, जिचा अर्थ मुख्य गटातून वगळलेला, निर्वासित केलेला, किंवा वेगळा केलेला असा होतो. ह्याचा संदर्भ पापाबद्दलच्या दैवी न्यायाचे कृत्य म्हणून मारले जाणे ह्याच्या संबंधात देखील येतो.

  • जुन्या करारामध्ये, देवाच्या आज्ञा न पाळण्याचा परिणाम म्हणून देवाच्या लोकांपासून आणि त्याच्या उपस्थितीपासून भर टाकले किंवा वेगळे केले जात असे.
  • देवानेसुद्धा असे सांगितले की, तो इस्राएली नसलेल्या राष्ट्रांना "कापून टाकेल" किंवा नाश करेल, कारण ते देवाची उपासना किंवा आज्ञा पळत नव्हते आणि ते इस्राएलाचे शत्रू होते.
  • "कापून टाकणे" या अभिव्यक्तीचा उपयोग एखाद्या नदीला वाहण्यापासून थांबवण्यासाठी देव कारणीभूत होतो ह्याच्या संदर्भासाठी केला जातो.

भाषांतर सूचना

  • "कापलेला असणे" या वाक्यांशाचे भाषांतर "वगळलेला असणे" किंवा "देऊ पाठविण्यात आलेला असणे" किंवा "वेगळा केलेला असणे" किंवा "मेलेला असणे" किंवा "नाश झालेला असणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "कापला जाणे" या शब्दाचे भाषांतर "नाश" किंवा "दूर पाठवणे" किंवा "च्या पासून वेगळा करणे" किंवा "नष्ट" असे केले जाऊ शकते.
  • वाहणारे पाणी कापले जाणे ह्याच्या संदर्भात, ह्याचे भाषांतर, ''थांबिवले" किंवा "वाहणे थांबविण्यासाठी कारणीभूत असणे" किंवा "वेगळे केलेले असणे" असे केले जाऊ शकते.
  • काहीतरी चाकूने कापणे ह्याच्या शब्दशः अर्थाला या शब्दाच्या लाक्षणिक अर्थाच्या उपयोगापासून वेगळे केले पाहिजे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1214, H1219, H1438, H1468, H1494, H1504, H1629, H1820, H1824, H1826, H2498, H2686, H3582, H3772, H5243, H5352, H6202, H6789, H6990, H7082, H7088, H7096, H7112, H7113, G609, G851, G1581, G2407, G5257