mr_tw/bible/other/counselor.md

3.3 KiB

सल्ला देणे, उपदेश देणे (सल्ला देणे), सल्ला दिला, सल्लागार, मसलत, मंत्री, मसलती

व्याख्या:

"सल्ला" आणि "मसलत" या शब्दांचा समान अर्थ आहे, आणि त्याचा अर्थ ठराविक परिस्थितीमध्ये काय करावे ह्याबद्दल एखाद्याला सुज्ञपणे निर्णय घेण्यास मदत करणे असा होतो. एक सुज्ञ "सल्लागार" किंवा "सल्ला देणारा" हा असा कोणीतरी असतो जो असा सल्ला किंवा मसलत देतो, जो त्या व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो.

  • राजा ज्या लोकांच्यावर राज्य करतो, त्यांना प्रभावित करणारे महत्वाचे मुद्दे ठरविण्यास, मदत करण्यासाठी राजांकडे अनेकदा अधिकृत सल्ला देणारे किंवा सल्लागार असत.
  • काहीवेळा सल्ला किंवा मसलत जी दिली जाते ती चांगली नसते. दुष्ट सल्लागार एखाद्या राजाला कारवाई करण्यास किंवा त्याच्या किंवा त्याच्या लोकांस हानी पोहचविण्याचा आदेश देण्यास भाग पडू शकतात.
  • संदर्भाच्या आधारावर, "सल्ला" किंवा "मसलत" ह्यांचे भाषांतर, "निर्णय घेण्यामध्ये मदत करणे" किंवा "सूचना" किंवा "आवर्जून सांगणे" किंवा "मार्गदर्शन" असे केले जाऊ शकते.
  • "मसलत देणे" या कृतीचे भाषांतर, "सल्ला देणे" किंवा "सूचना करणे" किंवा "आवर्जून सांगणे" असे केले जाऊ शकते.
  • "मसलत" हा शब्द "परिषद" ज्याचा संदर्भ लोकांचा समूह याच्याशी येतो, या शब्दापासून वेगळा आहे ह्याची नोंद घ्या.

(हे सुद्धा पहाः आवर्जून सांगणे, पवित्र आत्मा, सुज्ञ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1697, H1847, H1875, H1884, H1907, H2940, H3245, H3272, H3289, H3982, H4156, H4431, H5475, H5779, H5843, H6440, H6963, H6098, H7592, H8458, G1010, G1011, G1012, G1106, G4823, G4824, G4825