mr_tw/bible/other/clothed.md

3.9 KiB

पोशाख, युक्त व्हाल (वस्त्रे घातलेला), कपडे, वस्त्रे, वस्त्राशिवाय

व्याख्या:

जेंव्हा पवित्र शास्त्रामध्ये लाक्षणिक अर्थाने वापरले जाते, तेंव्हा "युक्त व्हाल" ह्याचा अर्थ कश्यानेतरी संपन्न किंवा सज्ज व्हाल असा होतो. एखाद्याला काश्याचातरी "पोशाख" घालणे ह्याचा अर्थ विशिष्ठ चारित्र्य गुण असण्याचा शोध घेणे असा होतो.

  • जसे कपडे आपल्या शरीराच्या बाह्य भागावर असतात आणि ते सर्वांना दृश्यमान असतात, त्याच प्रकारे, जेंव्हा आपण एका विशिष्ठ चारित्र्य गुणांसह "कपडे घालतो" तर त्यांना ते इतर सहजपणे पाहू शकतात. "स्वतःवर दयाळूपानाची वस्त्रे चढीव" ह्याचा अर्थ तू आपल्या कृत्यांमध्ये दयाळूपानाचा असा स्वभाव स्पष्ट कर, की प्रत्येकाला तो सहजपणे दिसला पाहिजे.
  • "उंचावरून सामर्थ्याची वस्त्रे असणे" ह्याचा अर्थ तुला शक्ती दिलेली असणे असा होतो.
  • या शब्दाचा उपयोग नकारार्थी अनुभव व्यक्त करण्यासाठी देखील केला जातो, जसे की, "लज्जेची वस्त्रे पांघरणे" किंवा "दहशतवाद्याची वस्त्रे परिधान करणे."

भाषांतर सूचना

  • शक्य असल्यास "च्या वस्त्राने स्वतःला पांघरून घे" या भाषेची शब्दशः आकृती ठेवणे उत्तम आहे. जर हे कपडे चढवणे ह्याला संदर्भित करत असेल तर, ह्याचे भाषांतर करण्याचा इतर मार्ग "वर ठेवा" असा होऊ शकतो.
  • जर हे अचून अर्थ देत नसेल तर "ने युक्त केलेला" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "दाखवणे" किंवा "प्रकट करणे" किंवा "ने भरलेला असणे" किंवा "चे गुण असणे" ह्यांचा समावेश होतो.
  • "स्वतःवर ची वस्त्रे चढीव" या शब्दाचे भाषांतर, "ने स्वतःला पांघरणे" किंवा "दिसेल अशा प्रकारे वागणे" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H899, H1545, H3680, H3736, H3830, H3847, H3848, H4055, H4346, H4374, H5497, H8008, H8071, H8516, G294, G1463, G1562, G1737, G1742, G1746, G1902, G2066, G2439, G2440, G3608, G4016, G4470, G4616, G4683, G4749, G5509, G6005