mr_tw/bible/other/chronicles.md

2.6 KiB

इतिहास

व्याख्या:

"इतिहास" या शब्दाचा अर्थ एखाद्या विशिष्ठ कालावधीमध्ये घडलेल्या घटनांची लिखित नोंद असा होतो.

  • जुन्या करारातील दोन पुस्तकांना "इतिहासाचे पहिले पुस्तक" आणि इतिहासाचे दुसरे पुस्तक" असे म्हंटले जाते.
  • या पुस्तकांना "इतिहास" असे म्हंटले जाते, आणि त्याच्यामध्ये इस्राएली लोकांच्या इतिहासाचा भाग नमूद केलेला आहे, त्याची सुरवात आदमापासूनच्या प्रत्येक पिढीतील लोकांच्या यादीने होते.
  • "इतिहासाचे पहिले पुस्तक" शौल राजाचा शेवट आणि दावीद राजाच्या राज्यातील घटनांना नमूद करते.
  • "इतिहासाचे दुसरे पुस्तक" शलमोन राजा आणि इतर दुसऱ्या राजांच्या राज्याबद्दल नमूद करते, ज्यामध्ये मंदिर बांधणे, आणि इस्राएलच्या उत्तरी राज्याचे यहूदाच्या दक्षिणी राज्यापासूनचे विभाजन ह्यांचा समावेश होतो.
  • 2 इतिहासाचा सेवट बाबेली लोकांच्या बंदिवासाच्या आरंभाचे वर्णन करतो.

(हे सुद्धा पहा: बाबेल, दावीद, बंदी, इस्राएलाचे राज्य, यहूदा, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1697