mr_tw/bible/other/bury.md

3.8 KiB

दफन, पुरून टाकल्या, पुरणे, पुरण्याच्या (दफन करणे)

व्याख्या:

"दफन" या शब्दाचा संदर्भ सहसा मृत शरीराला एखाद्या छिद्रामध्ये किंवा पुरण्याच्या जागी ठेवण्याशी आहे. * "दफन करणे" हा शब्द एखाद्या वस्तूला पुरण्याची क्रिया आहे, किंवा अशा जागेचे वर्णन करण्याकरिता वापरला जातो, जिथे कश्यालातरी दफन केले जाते.

  • बऱ्याचदा लोक मृत शरीराला जमिनीतील एका खोल छिद्रामध्ये ठेवतात आणि नंतर त्याला मातीने झाकून टाकतात.
  • काहीवेळा मृत शरीराला पुरण्याच्या आगोदर, पेटीच्या-आकाराच्या रचनेमध्ये ठेवतात, जसे की, शवपेटी.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, मृत लोकांना सहसा गुहेमध्ये किंवा त्यासारख्या जागेमध्ये पुरले जात असे. येशू मेल्यानंतर, त्याच्या शरीराला कपड्यामध्ये गुंडाळले आणि एका दगडाच्या कबरेमध्ये ठेवले आणि तिला मोठ्या धोंड्याने सीलबंद केले.
  • "पुरण्याची जागा" किंवा "पुरण्याची खोली" किंवा "दफन करण्याची खोली" किंवा "दफन करण्याची गुहा" हे सर्व मृत शरीर ठेवण्याच्या जागेला संदर्भित करण्याचे मार्ग आहेत.
  • इतर वस्तू देखील पुरल्या जाऊ शकतात, जसे की, अखानाने यरीहोमधून चोरून आणलेली चांदी आणि इतर वस्तू त्याने पुरून ठेवल्या.
  • "त्याचे तोंड पुरले" या वाक्यांशाचा सहसा अर्थ "त्याने त्याचा चेहरा त्याच्या हातांनी झाकला" असा होतो.
  • काहीवेळा "लपवणे" या शब्दाचा अर्थ "पुरणे" असा होतो, जसे की अखानाने यरीहो मधून चोरलेल्या वस्तू जमिनीत लपवल्या. ह्याचा अर्थ त्याने त्या वस्तूंना जमिनीमध्ये पुरले.

(हे सुद्धा पहा: यरीहो, कबर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6900, H6912, H6913, G1779, G1780, G2290, G4916, G5027